नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत आर्थिक फटका, 7 हजार थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, 400 कोटींची थकबाकी

नाशिक महापालिकेला कोरोनामुळं वर्षाकाठी 350 कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. यामुळे धास्तावलेल्या नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत आर्थिक फटका, 7 हजार थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, 400 कोटींची थकबाकी
Nashik Municipal corporation
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 11:59 AM

नाशिक: मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळं आणि लॉकडाऊनमुळं देशातील अनेक घटकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवल्यानं नाशिक महापालिकेच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत तब्बल 150 कोटी रुपयांची घट आलेली आहे. वर्षाकाठी नाशिक महापालिकेला 350 कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. यामुळे धास्तावलेल्या नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. (Nashik Municipal Corporation send notice to citizens who not paid water bill and home tax)

नाशिक महापालिकेची 400 कोटींपर्यंत थकबाकी

नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना काळात घरपट्टी,पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. आतापर्यंत महापालिकेची थकबाकी 400 कोटींपर्यंत गेली आहे. नाशिक महापालिकेचे पाणीपट्टीचे एकूण 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. त्यापैकी शहरात 7 हजार थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा दिला अल्टीमेटम,अन्यथा नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे.

नाशिककरांवर पाणी कपातीच्या संकट

जून महिना संपून जुलै महिन्यातील 10 दिवस उलटले तरी पावसानं दडी मारल्यानं नाशिक शहरावरील पाणी कपातीचं संकट अधिक गडद झालं आहे. नाशिककला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा राहिला आहे. जलंसपदा विभागानं नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्यानं नाशिकककरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार हे निश्चित झालं आहे.

जलंसपदा विभागाचं पालिकेला पत्र

नाशिक शहरवासियांवरील पाणीकपातीचे संकट गडद झालं आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणी कपातीच संकट ओढावलं आहे. गंगापूर धरणातील पाणी साठा गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं जलसंपदा विभागानं पालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. पाणी जपून वापरण्या बरोबरच अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दरात आकारणी करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडूनही पालिका अधिकाऱ्यांना वेळीच पाणी कपातीचा निर्णय घेण्याचे आदेश यापूर्वीचं देण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर,दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी दिल्याने पाणी कपातीच संकट अधिक गडद झालं आहे.

इतर बातम्या:

नाशिकवरील पाणी कपातीचं संकट गडद, जलसंपदा विभागाचं पालिकेला पत्र, अधिक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोना लसींचा तुटवडा, नाशिककरांची निराशा, 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचं लसीकरण, कोविशील्डचा साठा संपला

(Nashik Municipal Corporation send notice to citizens who not paid water bill and home tax)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.