AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मालेगावमध्ये घरात पाण्याचा ठणठणाट, रस्त्यावर महापूर; ऐन उन्हाळ्यातले हे चित्र पाहाच!

मालेगावमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलली गेलीय. मात्र, तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची ठिकाठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना योग्य ती खरबदारी घेतली जात नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय.

VIDEO | मालेगावमध्ये घरात पाण्याचा ठणठणाट, रस्त्यावर महापूर; ऐन उन्हाळ्यातले हे चित्र पाहाच!
मालेगावमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 16, 2022 | 9:48 AM
Share

मालेगावः ऐन उन्हाळ्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये घरोघरी पाण्याचा (Water) ठणठणाट आहे, तर रस्त्यावर महापूर दाटलाय. जलवाहिनी (Pipeline) फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रा रोडवरील रस्त्याचे काम सुरू असताना पाइपलाइन फुटली आणि पुरवठा विस्कळीत झाला. खरे तर शहराचा पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी. येथून जास्त दाबाने पुरवठा सुरू असतो. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीचा एक फटका जलवाहिनीला बसला आणि रस्त्यावर उंचच उंच पाण्याचे फवारे उडाले. कितीतरी वेळ प्रचंड दाबाने पाण्याचा निचरा सुरू होता. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. रस्त्यावर तर दुथडी भरून नदीच वाहतेय, असे चित्र होते. मात्र, आता दुरुस्ती होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या महिन्यातही जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना पाण्यासाठी वणवण करायची पाळी येतेय.

निवडणुकीच्या तोंडावर कामे जोरात

मालेगावमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलली गेलीय. मात्र, तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची ठिकाठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना योग्य ती खरबदारी घेतली जात नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय. वारंवार जलवाहिनी फुटतेय. त्यामुळे नागरिकांमध्ये पराकोटीचा संताप आहे.

यंदा पाऊस होऊनही…

विशेष म्हणजे यंदा जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल केले. खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील नदी, विहिरी सध्या तुडूंब आहेत. बहुतांश ठिकाणी यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे चित्र आहे. मात्र, कृत्रिम अडचणींमुळे पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. थोडी जरी दक्षता घेतली तरी, अशा चुका टाळता येऊ शकतात. त्यामुळे रस्त्याची कामे लक्ष देऊन करावी. महिन्यातून दोनदा आणि तीनदा जलवाहिनी फुटली, तर या कामाचा उपयोग काय, असा सवाल होत आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट