“इकडे मशीद काढा, तिकडे मंदिर बांधा, हे काही देशाचे प्रश्न…”; या नेत्याचा राज ठाकरे यांच्यावर प्रहार

राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे नाशिकमध्ये राष्ट्रवादीने बॅनर लावले होते.

इकडे मशीद काढा, तिकडे मंदिर बांधा, हे काही देशाचे प्रश्न...; या नेत्याचा राज ठाकरे यांच्यावर प्रहार
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 4:08 PM

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा कलगीतुरा चालू आहे. तर त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने ठाकरे गटावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार बच्चू कडू यांच्याकडूनही सरकारवर आणि भाजपवरही टीका केली जात असते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यावर ज्या प्रमाणे टीका केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवतिर्थावर अलोट गर्दीत सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्याबरोबरच त्यांनी मशीदवरील भोंग्याचा विषय घेऊनही त्यांनी टीका केली होती.

राज ठाकरे यांनी यावेळी मशीदवरील भोंगा उतरवा, मशीद पाडा नाहीतर त्याच्या दुसऱ्या बाजूला आम्ही मंदिर बांधू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता टीका केली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्या सभेविषयी राज ठाकरे यांच्यावर बोलताना म्हणाले की, सध्या राज्यात फक्त सभा घेणे आणि अश्वासनं देणं एवढच चालू आहे.

नुसत्या यांची गर्जना, त्यांची गर्जना, इकडे मशीद काढा, तिकडे मंदिर बांधा येथील भोंगे उतरवा हे एवढेच काही देशाचा प्रश्न नसल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली.

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे व इतरही अनेक प्रश्न असल्याचे बच्चू कडू यांनी येवला येथी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभा घेणार आहेत.

मात्र त्यांनी सभा घेतली तर लोकं दुसरा आमदार निवडून देतील. बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सभा घेण्यावरून सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे नाशिकमध्ये राष्ट्रवादीने बॅनर लावले होते.

त्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या या अज्ञानपणामुळेच त्यांची सत्ता नेहमी जाते. आणि भाजप त्याचा फायदा घेत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.