AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : भोंग्याबाबत नवे साहेब निर्णय घेतील; मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो हे विसरून जाणार, काय म्हणाले पांडेय?

गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेय यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यात हेल्मटसक्तीचा केलेला अतिरेक. ते थेट काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फोडलेला लेटरबॉम्ब. यामुळे स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले. त्यांनी पांडेय यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर महसूल संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

Nashik : भोंग्याबाबत नवे साहेब निर्णय घेतील; मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो हे विसरून जाणार, काय म्हणाले पांडेय?
बदलीनंतर दीपक पांडेय यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 9:57 AM
Share

नाशिकः जिल्ह्यात भोंग्याबाबत आता नवे साहेब निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गुरुवारी नाशिकहून (Nashik) बदली झालेले पोलीस आयुक्त (Commissioner) दीपक पांडेय यांनी दिली. राज्य सरकारने कालच पोलीस (Police) खात्यामध्ये अनेक फेरबदल केले आहेत. त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची बदली केली आहे. तर पांडेय यांना मुंबई येथील महिला सुरक्षा विभाग प्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पांडेय यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यात हेल्मटसक्तीचा केलेला अतिरेक. ते थेट काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फोडलेला लेटरबॉम्ब. यामुळे स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले. त्यांनी पांडेय यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर महसूल संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या प्रकरणानंतर पांडेय यांनी बदलीची मागणी केल्याचे समोर आले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. पांडेय यांनी आज बदलीनंतर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

भोंगे सोडून बोला…

नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भोंग्याबाबत घेतलेला निर्णयही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काहींनी त्यांचे कौतुक केले, तर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध. या साऱ्या प्रकरणावर ते म्हणाले, भोंग्याबाबतचा निर्णय आता नवे साहेब घेतील. मी विसरुन जाणार आहे की, मी इथे आयुक्त होतो. मी मोकळा होतोय. त्यामुळे भोंग्याच्या निर्णयाबाबत आता मी काही बोलणार नाही.

बदली ही नॉर्मल प्रक्रिया

पांडेय म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात बदली ही नॉर्मल प्रक्रिया आहे. मीच 20-25 दिवसांपूर्वी व्यक्तिगत कारणास्तव बदलीसाठी अर्ज केला होता. सरकारने विनंती ऐकली. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यावर आता अधिक मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.

कोणते प्रकरण भोवले का?

राणेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, भोंगे किंवा हेल्मेटचा निर्णय यामुळे बदली झालीय का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, रुल ऑफ रॉ चे हे सर्व विषय एकदम सोपे विषय आहेत. माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. मी रुल ऑफ रॉ समोर ठेवूनच काम केले. आमच्या आदेशावर शासन आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे. तिथे आमच्या आदेशाला आव्हान देता येऊ शकते. पण आम्ही शपथ घेतो की, आम्ही संविधानाच्या रक्षणाचे काम करणार आहोत. आमची जबाबदारी नागरिकांप्रती आहे. समाजाला काही फायदा होणार की नाही. मला एखाद्या आदेशाने समाधान वाटतेय की नाही, याचे ट्रेनिंगही दिलं जाते. मात्र, एक एक्स्झिक्युटिव पोस्टिंग झाल्यानंतर एक साइड पोस्टिंग झाली पाहिजे. त्यामुळे बॅटरी चार्ज होते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.