AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik News: खड्डे की मृत्यूचे सापळे? नाशिक शहरात खड्ड्यामुळे भीषण अपघात, आता दोघे… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

Nashik Pothole Accident: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे काही जण जखमी झाले. तर काहींना प्राण गमवावे लागले. खड्ड्यांविरोधात आंदोलन झाले. तरीही शहरातील अनेक भागातील खड्डे बुजवल्या गेले नाहीत. नाशिक महापालिका आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. सत्ताधाऱ्यांनीच त्याविरोधात आवाज उठवला आहे. आता पुन्हा शहरात खड्ड्यांमुळे भीषण अपघात घडला आहे.

Nashik News: खड्डे की मृत्यूचे सापळे? नाशिक शहरात खड्ड्यामुळे भीषण अपघात, आता दोघे... मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर
नाशिक खड्डे
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 9:03 AM
Share

नाशिकमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही भागातील खड्यांची तात्पुरती डागडुजी करून महापालिका पुन्हा कुंभकर्णी झोपेत गेली आहे. शहरातील अनेक भागात खड्यांचे साम्राज्य आहे. खड्डे चुकवताना वाहन चालकांची भांबेरी उडत आहे. खड्यांमुळे वाहनधारकांचा जीव गेला आहे. काही जण जखमी झाले आहेत. सत्ताधारी नगरसेवकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला. मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. पण महापालिकेला त्याचे सोयरसुतक नाही. नाशिक शहरात खड्ड्यामुळे पुन्हा भीषण अपघात झाला आहे. त्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक शहरात खड्ड्यामुळे पुन्हा भीषण अपघात

नाशिक शहरात खड्ड्यामुळे पुन्हा भीषण अपघात झाला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. कुणाल महाले आणि प्रभाकर माने गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही ८ ते १० टाके पडल्याची माहिती समोर येत आहे. हिरावाडीतील अमृतधाम परिसरात ही घटना घडली आहे. खड्ड्यामुळेच अपघात झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे. नगरसेविका प्रियांका माने यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली. अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्याची नगरसेविका प्रियांका माने यांनी मागणी केली. नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्डे न बुजवल्यास महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

गेल्या काही दिवसात नाशिकमधील खड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनस्तरावर जय्यत तयारी सुरू असताना कुंभनगरीतच खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार ओरड होऊनही महापालिका ढिम्म असल्याचे समोर आले आहे. याविषयीच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर असल्याचे समजते. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून फडणवीसांची 8 तारखेला आढावा बैठक आहे. 7 तारखेची महासभा रद्द करून फडणवीस हे आढावा बैठक घेणार आहेत. 8 तारखेला मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आढावा बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 ऑगस्टपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचा आढावा घेणार आहेत. BlA यांच्यासह महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसह बैठक आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला आहे. शहर कार्यकारणी सह इतर अंगीकृत संघटनांच्या शासकीय विश्रामगृह येथे संयुक्त बैठक होईल. नाशिक मध्ये ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीत झालेल्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे नाशिकमधील खड्डे आणि नागरी सुविधांच्या अभावावर बोलण्याची शक्यता आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं