नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट

जून महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाने दिलेल्या दडी नंतर शेतीच्या कामांना ही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. Nashik Rain Update

नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाढले आहे.
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 10:36 AM

नाशिक : जून महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्याकडे (Nashik Rain Update) पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाने दिलेल्या दडी नंतर शेतीच्या कामांना ही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये फक्त 27 % पाणीसाठा शिल्लक राहिलाय त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 38% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने अधिक चिंता वाढलीय. गंगापूर,पालखेड,दारणा,ओझरखेड,भावली,या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यास भीषण पाणी टंचाई ओढवण्याची शक्यता आहे. (Nashik Rain Update due to low rain farm works stopped and Nashik people faces water crisis)

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकंट

नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेय. रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्यात. मात्र, मृग नक्षत्रात अद्यापही पाऊस झालेला नाहीये आठवडाभरात पाऊस झाला नाही . नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरणी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खरिपाच्या 3.22 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता पाऊस लांबल्याने या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरेशा पावसानंतर पेरणी करावी, दादा भुसेंचं आवाहन

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुरेसा पाऊस होत नाही तो पर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पेरणीचा मोठा अनुभव आहे. व्यवस्थित पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असंच आहे,असं देखील ते म्हणाले. ते शेतकरी कार्यशाळेत बोलत होते.

राज्यात 22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जून पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या.

संबंधित बातम्या:

बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

(Nashik Rain Update due to low rain farm works stopped and Nashik people faces water crisis)

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.