AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीराम कुठल्याही पक्षाची मालमत्ता नाही, आता ‘भाजपमुक्त जय श्रीराम’ करावा लागेल- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Ayodhya Ram Mandir Pranpratistha : नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनात बोलताना ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. शिवराय नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

श्रीराम कुठल्याही पक्षाची मालमत्ता नाही, आता 'भाजपमुक्त जय श्रीराम' करावा लागेल- उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 23, 2024 | 1:08 PM
Share

योगेश बोरसे- प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत. या महाअधिवेशनात बोलताना ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. राम कुठल्याही व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी मालकी केली तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजपमुक्त श्रीराम. नुसतं जय श्रीराम नाही. भाजप मुक्त जय श्रीराम. काय चाललंय आज. ज्यांनी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवलं. शिवसैनिक सोबत होते. काही कारसेवक आजही आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

ठाकरेंचा भाजपवर शाब्दिक हल्ला

मी अयोध्येला गेलो. अयोध्येला कधी येणार सांगत होते. आज मोदी अयोध्येला गेले. पण पूर्वी गेले नव्हते. पंतप्रधान होण्याआधी गेले असतील. फडणवीस म्हणतात तसे म्हणाले. मी शिवनेरीला गेलो. मी तिथली माती अयोध्येला गेलो. तुम्ही माना अथवा नको मानू. मी तिथे गेलो आणि थंड बस्त्यातील अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा त्या मातीचा महिमा आहे. ती माती जिल्ह्यात न्यायला सांगतो. कारण त्याचा महिमा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला.

राऊतांच्या भाषणावर ठाकरेंची टिपण्णी

काही वेळेआधी संजय राऊतांनी या अधिवेशनात भाषण केलं. यावेळी त्यांनी ठाकरेंची प्रभूरामांशी तुलना केली. यावर ठाकरेंनी भाष्य केलं. आज रामायणातील बारकावे संजय राऊत यांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते. राऊतांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा याचे श्लोक सांगितले. संयम , एक वचनी आणि एक पत्नी ते खरच आहे. माझा उल्लेख केला. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. श्रीरामचंद्राचे अनुयायी म्हणून बरोबर आहे. रामाशी तुलना केली नाही त्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत ठाकरेंनी राऊतांचे आभार मानले.

काल सर्व अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचं ज्ञान आणि बुद्धीचा आदर करतो. कुणी तरी एकाने मोदींची बरोबरी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. आजचे शिवाजी म्हणजे पंतप्रधान. अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. तुम्ही तिकडे बसला ते केवळ शिवाजी महाराजांमुळेच नाही तर ते ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हतं. ती माती आहे, त्यात ते तेज जन्माला आलंय, असंही ठाकरे म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.