मोदी याआधी अयोध्येला गेले नाहीत, पण आता…; मोदींवर बोलताना ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

Uddhav Thackeray on PM Naredra Modi and Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. नाशिकच्या महाअधिवशेनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केलाय. ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मोदी याआधी अयोध्येला गेले नाहीत, पण आता...; मोदींवर बोलताना ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 1:41 PM

योगेश बोरसे- प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा दिवशी एक फोटो ट्विट केला. हा नागपूर स्टेशनवरचा असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय या फोटोत दिसणारे लोक कारसेवक आहेत. ते अयोध्येला निघाले असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या फोटो फडणवीसांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला हायलाईट करण्यात आलं आहे. या फोटोत फडणवीस असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नरेंद्र मोदींवर बोलताना उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला.

ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मी अयोध्येला गेलो. अयोध्येला कधी येणार सांगत होते. आज मोदी अयोध्येला गेले. पण पूर्वी गेले नव्हते. पंतप्रधान होण्याआधी गेले असतील. फडणवीस म्हणतात तसे म्हणाले. मी शिवनेरीला गेलो. मी तिथली माती अयोध्येला गेलो. तुम्ही माना अथवा नको मानू. मी तिथे गेलो आणि थंड बस्त्यातील अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा त्या मातीचा महिमा आहे. ती माती जिल्ह्यात न्यायला सांगतो. कारण त्याचा महिमा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘त्या’वर पण बोला- ठाकरे

स्वातंत्र लढ्यात आरएसएस नव्हती. त्यांनी कुठे भाग घेतला नाही. ते आयते स्वातंत्र उपभोगत होती. काँग्रेस लढ्यात होती. तुरुंगवास भोगला. सावरकर होते. कान्हेरे होते. स्वातंत्र्य लढ्यात लढणारी काँग्रेस नको, म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर शामा प्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं. ११ महिने त्या हकच्या मंत्रिमंडळात शामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला हा त्या मंत्रिमंडळात होता. त्यांच्याबद्दल बोला, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलंय.

“जय श्रीराम बोलत असाल तर तसं वागा”

तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता? आधी तुमची जन्म कुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेत राहू केतू आले असतील. आम्ही काय करू त्याला. तुमच्याकडे चांगला गुर नाही. तर हे सर्व पाहिल्यावर यांची लायकी काय ते कळते . मलाही थोडा पश्चात्ताप होतो. त्यावेळी हिंदुत्व म्हणून ते आणि आपण भगव्यासाठी एकत्र झालो होतो. त्या भगव्यात भेद करणारे हे नालायक आहेत. ही सर्व विचारांची झालेली वाताहत पाहिल्यावर लोकांनी यांना गारठून टाकलंय. नुसतं जय श्रीराम, जय श्रीराम सुरू आहे. फक्त जय श्रीराम बोलू नका, जय श्रीराम बोलत असाल तर रामासारखं वागा. तसं वागा, असा घणाघात ठाकरेंनी केला आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.