AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर धक्काबुक्की, शिवीगाळ, दराडे-गीते आमने-सामने

Nashik Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये विधान परिषदेची चुरस अजून वाढली आहे. वरंवर जरी शांत वाटत असलं तरी आतमधून तसं नव्हतं. हे आता स्पष्ट झालं आहे.

Nashik Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर धक्काबुक्की, शिवीगाळ, दराडे-गीते आमने-सामने
Nashik
| Updated on: Jun 22, 2026 | 3:25 PM
Share

नाशिकमध्ये निकालाच्या दिवशीही गोंधळ कायम आहे. गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणी ठरलेल्यावेळी 8 वाजता सुरु होऊ शकली नाही. मतमोजणी केंद्रात विद्यमान आमदार उपस्थित असल्यामुळे गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत गीते यांच्या आक्षेपाचं निरसन करण्यात आलं आहे. आता मतमोजणी सुरु झाली आहे. पण किशोर दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात शाब्दीक बाचाबाची होऊन शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. मतमोजणी केंद्रावर धक्काबुक्की झाल्याची सुद्धा माहिती आहे.

नाशिक विधान परिषदेची निवडणूक सुरुवातीपासून चर्चेत आहे. महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार आहेत. पण भाजपच्या गीते बंधुंनी विरोधात जाऊन उमेदवारी दाखल केली. पक्षाने समजावल्यानंतर गणेश गीते यांनी माघार घेतली. पण गोकुळ गीते हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेल्याने गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम होती. उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी समजावल्यानंतर गोकुळ गीते यांनी फक्त प्रचार थांबवला होता. पण त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला नव्हता.

 गोकुळ गीते अजूनही शर्यतीत

आज निकालाच्या दिवशी दराडे आणि गीतेंमधील ही स्पर्धा पुन्हा एकदा समोर आली आहे. गोकुळ गीते अजूनही शर्यतीत आहेत, म्हणूनच त्यांनी मतदान केंद्रावर किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. नाशिकच्या जागेचा हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला होता. एकनाथ शिंदे स्वत: गोकुळे गीते यांच्याशी बोलले. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. वरवर जरी शांत वाटत असलं, तरी आतून आणि पडद्याआडून बऱ्याच घडामोडी घडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नाशिक विधान परिषदेची जागा प्रतिष्ठेची बनली असून राज्याचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन