Manmad | मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण अखेर ओव्हर फ्लो…

| Updated on: Aug 17, 2022 | 10:11 AM

मनमाड शहराला पाणीटंचाईची मोठी समस्या आहे. दरवेळी प्रशासनाकडून मनमाड शहरात पाणीकपात केले जाते. मात्र, यंदा वागदर्डी धरण ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांची मोठी चिंता मिटलीयं. यंदा दीड महिन्याच्या अगोदर धरण ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांमध्ये आनंद बघायला मिळतो आहे.

Manmad | मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण अखेर ओव्हर फ्लो...
Follow us on

मनमाड : मनमाड (Manmad) शहराला पाणी पुरवठा करणारे धरण वागदर्डी अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे मनमाडकरांची पाणीटंचाईमधून सुटका होणार हे नक्की. पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या मनमाडच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालायं. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांना धरण ओव्हर फ्लो (Over flow) झालंय. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे महिनाभरापूर्वीच ओव्हर फ्लो झाली. मात्र, गंगापूर धरण 82 टक्के भरले असून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसाने मनमाडचे वागदर्डी धरण (Wagdardi Dam) 100 टक्के भरले आहे.

धरण ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांची मोठी चिंता मिटली

मनमाड शहराला पाणीटंचाईची मोठी समस्या आहे. दरवेळी प्रशासनाकडून मनमाड शहरात पाणीकपात केली जाते. मात्र, यंदा वागदर्डी धरण ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांची मोठी चिंता मिटलीयं. यंदा दीड महिन्याच्या अगोदर धरण ओव्हर फ्लो झाल्याने नागरिकांमध्ये आनंद बघायला मिळतो आहे. धरण 100 टक्के भरले असले तरी भर पावसाळ्यात मनमाड शहराला 15 ते 16 दिवसाआड पाणी पुरवठा सुरु होता. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोयं.

हे सुद्धा वाचा

पालिकेने किमान आठ दिवसाआड पाणी करावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे

धरण भरल्याने किमान आठ महिने हे पाणी शहराला पुरेल व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही मिळणार असल्याने पुढील काळात मनमाड शहराला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही असे सांगितले जात आहे. पालिकेने किमान आठ दिवसाआड पाणी करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कारण 16 दिवसांचा पाणी साठा करायचा म्हटल्यावर नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे धरण ओव्हर फ्लो झाल्याने आतातरी किमान आठ दिवसाला पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी जोर धरू लागलीयं.