VIDEO: एनसीबीच्या पंचाचे आरोप धक्कादायक, संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; नवाब मलिकांपाठोपाठ संजय राऊतांची मागणी

एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. (sanjay raut demands judicial inquiry of ncb raids)

VIDEO: एनसीबीच्या पंचाचे आरोप धक्कादायक, संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; नवाब मलिकांपाठोपाठ संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 3:36 PM

नाशिक: एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली आहे. दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी करावी असं नाही. हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. मलिक यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती चौकशी झाली पाहिजे. कोणतीही चौकशी करा, पण या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशीच केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, असंही ते म्हणाले.

मलिकांच्या पाठी उभे राहा

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. खरंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभं राहायला पाहिजे होते, असं आवाहन राऊत यांनी केलं.

एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, कारवाई केली. ते ठीक आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणापासून ते रिया चक्रवर्तीपासून अन्य काही लोकं असतील, सतत असे गुन्हे निर्माण केले की त्यांच्या कारवाईवर संशय यावा. त्याच्यावर कुणी संशय निर्माण केला की मग आरोप करणाऱ्यांवर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात अशी टीका केली जाते. पाकिस्तानचे ब्रँड अॅम्बेसिडर आहात, असं म्हटलं जातं, असा टोला त्यांनी लगावला.

तुमचं मुंबई, महाराष्ट्राविषयी प्रेम नाही?

नवाब मलिक यांनी या प्रकरणाच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. पण एकदा या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो मुखवटा आहे, खरा चेहरा आहे तो समोर आला पाहिजे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी असेल तुम्ही महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काय समजता? आम्ही घाबरत नाही तुम्हाला. तुम्ही आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रिकडून ज्या खंडण्या उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत हे कोणाच्या सांगण्यावरुन, जी रक्कम काही कोटींमध्ये आहे. पुन्हा तुम्ही या तपास यंत्रणांच्या बाजून उभे राहतात, अधिकाऱ्यांची वकिली करतात, तुम्हाला महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी प्रेम नाही? तुम्हाला राज्याची बदनामी करण्याची जी उर्मी आलीय ते उघडी पडली आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी सुमोटो कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आमच्या सारखे लोकं यामध्ये भरडले जातात. आम्ही घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्य समोर जावं लागतं. आम्ही सामान्य कुटुंबातील लोकं आहोत. पण ईडीसमोर अत्यंत अपमानास्पद जावं लागतं. असे अनेक लोकांना जावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.

घराघरात गांजा पिकतो का?

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार आहे हे दिसून आलं. मुंबई महाराष्ट्रात एनसीबी फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घरातघरात, बाल्कनीत चरस-गांजाचे पिके काढतात, या राज्याचे लोकं अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्यूमोटो घेऊन या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या:

बॉलिवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणून बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; संजय राऊत यांचा आरोप

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

रंगेल राजाचे 5000 महिलांशी लैंगिक संबंध, फीमेल हार्मोन्स शरीरात सोडून राजाला केलं ‘शांत’!

(sanjay raut demands judicial inquiry of ncb raids)

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.