Nashik Corona | नाशिक शहरात कलम 144 लागू; उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं, पर्यटनस्थळे सर्व बंद 

नाशिक शहरातही आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून त्यानुसार दिवसा जमावबंदी तर संचारबंदी असेल. तसेच किल्ले, प्राणीसंग्रहालये, उद्यानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik Corona | नाशिक शहरात कलम 144 लागू; उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं, पर्यटनस्थळे सर्व बंद 
CORONA LOCKDOWN

नाशिक : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे चिंता वाढली असून आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये निर्बंध कडक केले जात आहे. दरम्यान, नाशिक (Nashik) शहरातही आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून त्यानुसार दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल. तसेच किल्ले, प्राणीसंग्रहालये, उद्यानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं आणि पर्यटनस्थळे बंद 

नाशिक शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता येथे दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू असेल. तसेच जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी

याव्यतिरिक्त खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी कामाचे विभाजन 24 तासात करण्याचे नाशिक प्रशासनाने सांगितले आहे. खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व सुधारित आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 1549 नवे कोरोनाबाधित आढळले 

दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे.काल दिवसभरात येथे 1549 कोरोना बाधित आढळले आहेत. यात सर्वाधिक 1184 रुग्ण नाशिक शहरात आढळले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांचा वाढता आलेख बघता,आरोग्य विभाग हायअलर्टवर आहे.

इतर बातम्या :

Malegaon Corona | तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आता ‘मालेगाव पॅटर्न’चा अभ्यास, आरोग्य विद्यापीठाकडून 40 तज्ज्ञांचे पथक

Nashik|नाशिककरांसाठी आनंदवार्ता, महापालिका सुरू करणार 106 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन!

Corona|पहिल्या लाटेत 5 हजार, दुसऱ्या 8 हजार, तिसऱ्यात फक्त 27 रुग्ण; ‘मालेगाव मॅजिक’चे कोडे!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI