Corona|पहिल्या लाटेत 5 हजार, दुसऱ्या 8 हजार, तिसऱ्यात फक्त 27 रुग्ण; ‘मालेगाव मॅजिक’चे कोडे!

मालेगावमधील सध्याच्या कोरोना परिस्थितीबद्दल महापौर ताहेरा शेख म्हणतात की, सध्या मालेगावमध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही. आमच्या शहरासाठी ही अभिमान आणि गौरवाची बाब आहे. इथे रुग्णसंख्या कमी का, याचे कोडे चक्क आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही पडले आहे.

Corona|पहिल्या लाटेत 5 हजार, दुसऱ्या 8 हजार, तिसऱ्यात फक्त 27 रुग्ण; 'मालेगाव मॅजिक'चे कोडे!
corona test
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 3:39 PM

नाशिकः कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गलितगात्र झालेले नाशिक जिल्ह्यातले मालेगाव उभ्या राज्याने पाहिले. इथे सुरुवातीला ज्या पटीने रुग्ण आणि मृत्यू वाढले, ते पाहता साऱ्यांनाच धास्ती झाली. दाटीवाटीची लोकसंख्या, संयुक्त कुटुंब पद्धती आणि वस्ती-वस्तीत शिरलेला कोरोना. त्यामुळे नागरिकांचे अतिशय हाल झाले. त्यात टाळेबंदीमुळे रोजगार हिरावलेला. अशा दुहेरी कोंडीत इथला नागरिक सापडला. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. ओमिक्रॉनच्या फैलावाने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, मालेगाव एका स्थितप्रज्ञासारखे अविचल आणि शांत आहे. दोन्ही लाटेत वाढणारे कोरोना रुग्ण यावेळेस मात्र वाढताना दिसत नाहीत. हेच ध्यानात घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शास्त्रीय संशोधन सुरू केले आहे.

मालेगावचा दौरा केला

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर या दोघांनीही मालेगावचा दौरा करत आरोग्य यंत्रणा आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यानंतर याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगावमध्ये 5 हजार आणि दुसऱ्या लाटेत 8 हजार रुग्ण सापडले. मात्र, सध्या येथे फक्त 27 रुग्ण आहेत. याचे आश्चर्य वाटत आहे. याच मालेगाव मॅजिकचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

40 तज्ज्ञ करणार 15 दिवस संशोधन

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या औपचारिक चर्चा झाली. त्यातूनच ‘मालेगाव मॅजिक’वर शास्त्रीय संशोधनाची संकल्पना पुढे आली, असेही यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महापालिका आरोग्य यंत्रणेच्या मदतीने 40 तज्ज्ञांचे पथक सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांत येथे संशोधन केले जाणार असून, त्यातून काय निष्कर्ष समोर येणार याची उत्सुकता लागली आहे.

महापौर म्हणतात…

मालेगावमधील सध्याच्या कोरोना परिस्थितीबद्दल महापौर ताहेरा शेख म्हणतात की, सध्या मालेगावमध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही. आमच्या शहरासाठी ही अभिमान आणि गौरवाची बाब आहे. इथे रुग्णसंख्या कमी का, याचे कोडे चक्क आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही पडले आहे. त्यामुळे त्यांनी संशोधनासाठी आमच्या शहराची निवड केली आहे. आमच्या येथील नागरिक विद्यापीठाच्या सर्वेक्षण आणि संशोधनाला नक्कीच मदत करतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. अखेर या मॅजिकचा शोध घेण्यासाठी संशोधन तर सुरू झाले आहे. आता फक्त पंधरा दिवसानंतर काय समोर येते, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचा विषय आहे. कारण उर्वरित महाराष्ट्र आणि देशालाही हे संशोधन उपयोगी पडल्यास नवल वाटू नये म्हणजे झाले.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.