बँक कर्मचाऱ्यांनी केला प्रताप…बापरे! ग्राहकांच्या पैशांचे काय केले पाहा…

नाशिकच्या ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा जुगार झाल्यानं खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा अफरातफर झाल्यानंतर हा पैसा कुठे आणि कसा वापरला गेला यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

बँक कर्मचाऱ्यांनी केला प्रताप...बापरे! ग्राहकांच्या पैशांचे काय केले पाहा...
Image Credit source: The bank employees were beaten on the money in the bank money used for gambling
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:02 PM

नाशिक : बँकेतील पैशांचा बँक कर्मचाऱ्यांनी जुगार खेळला असं तुम्हाला कोणी बोललं तर विश्वास बसणार नाही. पण हे घडलंय, नाशिकच्या ( Nashik Ozhar ) ओझरमध्ये. सिद्धिविनायक पतसंस्थेतील ( Bank ) तीन कोटी रुपयांच्या अपहाराबाबत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ग्राहकांचा पैसा संस्थेच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी चक्क बिंगो रोलेटमध्ये ( Bingo )उडवल्याची माहिती समोर आलीय. संस्थेच्या खात्यातूनच तब्बल तीन कोटींचा अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे.

संस्थेतील कर्मचारी जर ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले असतील तर सर्वसामान्य ग्राहकांच्या पैशाची काय सुरक्षा असेल असा सवालही उपस्थित केला जातोय.

नाशिकच्या ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा जुगार झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

एवढ्या मोठ्या रकमेचा अफरातफर झाल्यानंतर हा पैसा कुठे आणि कसा वापरला गेला यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संस्थेच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी बिंगो रोलेटमध्ये उडविले असल्याची माहिती समोर येत आहे.

संस्थेच्या खात्यातूनच हा पैसा वळविल्याची माहिती काही संचालकांनी उघडकीस आणली आहे. रोलेट बिंगो हा जुगार खेळण्यासाठी वापरला गेलेला पैसा हा थेट बँकेच्या खात्यातून पाठवला आहे.

संचालकांनी जवळपास ५२ लाखांचा भरणा केला आहे. संस्थेतील अफरातफरीची सारवासारव करण्यात लेखापाल यांचा हात असला तरी संचालकांकडे संशयाची सुई जात आहे.

ज्यांच्या नावावर सेवक कर्ज दाखविण्यात आले आहे, ज्या संचालकांनी बँकेत पैसे भरले आहेत त्यांचाही रोलेट बिंगो प्रकरणाशी संबंध आहे का याचा कायदेशीर तपास करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणामुळे बँकेची इज्जत वेशीवर टांगली गेलीय. सहनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले असून स्थानिक पोलिसांत याबाबत तक्रारही देण्यात आली आहे. त्यात बँकेचे ऑडिटही सुरू असल्याने बँकेच्याबाबत आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.