तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा, फडणवीसांनी शड्डू ठोकला

Balasaheb Sanap joins BJP : शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस बोलत होते.

तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा, फडणवीसांनी शड्डू ठोकला
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:51 PM

मुंबई : “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलंय. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap BJP) यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस बोलत होते. “काही निवडणुकांमध्ये इकडे तिकडे झाले म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Balasaheb Sanap joins bjp in presence of  Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत सोबत यावे (त्यांनी एकत्र निवडणूक लढवावी) ही तर आमची इच्छा आहे. ते सोबत आल्यामुळे त्यांना स्पेस उरणार नाही. एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही. या तिन्ही पक्षाने आपल्या संधी दिली आहे जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू.

वाचा :  बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

भाजापचे आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या ते उठवत राहतात. पण कुणीही जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात. या देशाचा वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदी आहेत, हे आमच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. सर्व निवडणुका आम्ही जिंकत आहोत. येत्या काळात लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यांना चांगली जबादारी आपण देणार आहोत. परिवारामध्ये छोटा वाद होतो, पण परत ते एकत्र येतात. बाळासाहेब सानप आपल्यासोबत आले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“बाळासाहेब सानप जमिनीशी जोडलेले नेते”

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या सर्वांकरिता आज आनंदाचा दिवस आहे. आपल्यापासून दुरावलेले सानप पुन्हा एकदा प्रवेश करत आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत ज्याचं परिश्रम आहे त्यात सानप आहेत. काही समज आणि गैरसमजामुळे अंतर निर्माण झाले होते. मात्र ते मनापासून आपल्या सोबतच होते. पक्षाचा एवढा मोठा नेता, ज्याच्या मनात पक्ष आहे त्यांना सोबत घ्यायला हवं”

आम्हाला काही निगेसिएशन करावे लागले नाही. आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पुढचे 35 वर्ष आनंदानी काम करायचं. कुंभ मेळ्याच्या वेळेस गिरीश महाजन यांच्यासोबतीला सानप आले. सर्वांच्या मदतीने चांगल्या रितीने काम झाले.

जमिनीशी जोडलेला नेता म्हणून सानप यांच्याकडे पाहिलं जातं. नवा जुना काही वाद नाही. आम्ही सर्वजण आहोत, कही अडचण असेल तर ती आम्ही दूर करु.

सानपांकडे कोणती जबाबदारी?

बाळासाहेब सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सानप यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, तर वसंत गीते यांच्याकडे अखिल भारतीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांनी गीते यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचं कळतंय.

(Balasaheb Sanap joins bjp in presence of  Devendra Fadnavis)

संबंधित बातम्या 

नाशिक महापालिकेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली, सानपांकडे मोठी जबाबदारी   

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?  

नाशिकमध्ये बाळासाहेब सानपांची घरवापसी, भाजपला किती फायदा? किती तोटा? 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.