नाशिक महापालिकेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली, सानपांकडे मोठी जबाबदारी

नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी बाळासाहेब सानप यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक महापालिकेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली, सानपांकडे मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 11:19 AM

मुंबई: शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपवासी होत आहेत. त्यानंतर लगेच सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सानप यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, तर वसंत गीते यांच्याकडे अखिल भारतीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांनी गीते यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचं कळतंय. (Balasaheb Sanap is likely to get a big responsibility in the BJP)

शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपचा एक गट नाराज

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे.

शिवसेनेला रामराम का?

बाळासाहेब सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेकडूनही प्रयत्न झाले. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या आश्वासनावर सानप समाधानी नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर सानप अडगळीत गेले होते. आता पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नाशिक महापालिकेसाठी मनसेही सज्ज

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी 7 डिसेंबर रोजी  ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानप यांचा भाजपप्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

Balasaheb Sanap is likely to get a big responsibility in the BJP

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.