AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे.

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM
Share

नाशिक : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) पुन्हा भाजपचा झेंडा हाती धरत आहेत. आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्याच एका गटातून उपस्थित होत आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयात भाजपप्रवेश करणार आहेत. (Nashik Leader Balasaheb Sanap to join BJP again)

भाजपच्या गटातून नाराजी

बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, थेट प्रदेश पातळीवरूनच सानप यांना पक्षप्रवेशाच्या पायघड्या घालण्यात आल्याने भाजप नाशिकमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत बाळासाहेब सानप ?

– भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर – भाजपमधून 2014 साली नाशिक पूर्वमधून आमदार – 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली – विधानसभा निवडणुकीत सानप यांचा पराभव – पराभवानंतर सानप यांचा शिवसेनेत प्रवेश – नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद – गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी ओळख – नाशिक पालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली – आगामी नाशिक पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का (Nashik Leader Balasaheb Sanap to join BJP again)

सानप का हवेत?

सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप पक्षात आल्यास किमान 15 नगरसेवक सहज निवडून आणणे सोपे होईल, असा प्रत्येक पक्षाचा अंदाज आहे. त्यामुळे सानप यांना पुन्हा पक्षात घेण्यास भाजपने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शिवसेनेत असमाधानी?

दुसरीकडे बाळासाहेब सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न केले. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या आश्वासनावर सानप समाधानी नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर सानप अडगळीत गेले होते. आता पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब सानप यांचा भाजपप्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

(Nashik Leader Balasaheb Sanap to join BJP again)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....