AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये बाळासाहेब सानपांची घरवापसी, भाजपला किती फायदा? किती तोटा?

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण तापलं आहे.

नाशिकमध्ये बाळासाहेब सानपांची घरवापसी, भाजपला किती फायदा? किती तोटा?
| Updated on: Dec 20, 2020 | 5:27 PM
Share

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण तापलं आहे. एकिकडे शिवसेनेने नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असणार अशी गर्जना केलीय, तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेचे बडे नेते बाळासाहेब सानप यांना फोडत शिवसेनेला धक्का दिलाय. मात्र, अवघ्या 2 वर्षात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि आता पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या बाळासाहेब सानप यांचा भाजपला किती फायदा आणि किती तोटा होणार याची जोरदार चर्चा रंगलीय. घरवापसी करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी (21 डिसेंबर) 12 वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा निश्चित केलाय (Benefits and loss of BJP after rejoining of Balasaheb Sanap in Nashik).

बाळासाहेब सानप नाशिकच्या राजकारणातल मोठं नाव आहे. त्यांनी भाजपमध्ये शहराध्यक्ष, उपमहापौर, महापौर, आमदार यासारखी अनेक पदं भूषवली. भाजपला नाशिकमध्ये सुगीचे दिवस आणण्यात बाळासाहेब सानप यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेत 14 नगरसेवकांवरून 66 नगरसेवक करण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. मात्र, मागील विधानसभेत त्यांना भाजपने तिकीट नाकारलं आणि नुकताच मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राहुल ढिकले यांना तिकीट दिलं. यानंतर सानप नाराज झाले.

“अवघ्या 2 वर्षात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि आता पुन्हा भाजप असा प्रवास”

सानप यांनी आपला एक गट फोडत तात्काळ राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेच तिकीट मिळवलं. मात्र, त्यांचा तिथं मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीतही सानप फार काही रमले नाही. त्यांनी पुन्हा पक्ष बदल करत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतही त्यांची नाराजी कायम राहिली. नाशिकच्या शिवसेनेत कुठेही चांगलं स्थान त्यांना दिल गेलं नाही. पक्ष प्रवेशावेळी तुमचा योग्य विचार करू, असा शब्द दिला गेला होता. मात्र सेनेत काहीही मिळाल नाही, अशी त्यांची नाराजी आहे.

बाळासाहेब सानप यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी आपल्या नाराजीबाबत आणि उत्तर महाराष्ट्रात नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांची तिथे चर्चाही झाली. मात्र बाळासाहेब सानप यांची नाराजी काही दूर झाली नाही. त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

“फडणवीसांकडून सानप यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटल्याचा जाहीर आरोप”

यावर बोलताना नाशिकचे राजकीय विश्लेषक मिलिंद सजगुरे म्हणाले, “मागील काही घडामोडी लक्षात घेतल्या, तर भाजपचं राजकारण कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. सानप यांनी भाजपला सोड चिठी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्य सानप यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली होती. सानप यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि त्यामुळेच आपण त्यांना नाकारलं असं फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. मात्र त्याच सानप यांना पुन्हा भाजप प्रवेश देत असल्यानं भाजप किती बॅकफूटवर आहे हे सिद्ध होतंय.”

आता सानप यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. सानप यांच्या येण्याने नक्कीच पक्षाला फायदा होईल, असं मत भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता बाळासाहेब सानप यांच्या प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होतोय की सानपांच्या प्रवेशाने भाजपमधील काही जण नाराज होऊन भाजपला रामराम ठोकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

बाळासाहेब सानप यांचा सोमवारी भाजपमध्ये प्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का!

Balasaheb Sanap: भाजपचं इनकमिंग उद्धव ठाकरेंनी रोखलं? बाळासाहेब सानपांची नाराजी दूर करण्यात यश?

Nashik | नाशकात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप, पोलीस महानिरीक्षकांचा कडक कारवाईचा इशारा

Benefits and loss of BJP after rejoining of Balasaheb Sanap in Nashik

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.