नाशिक बोर्डः दहावी, बारावी परीक्षा वैयक्तिक देण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अशी करा नावनोंदणी

| Updated on: Sep 27, 2021 | 5:13 PM

फेब्रुवारी - मार्च 2022 मध्ये होणाऱ्या 12 वी (HSC) आणि 10 वी (SSC) परीक्षा (EXAM) खासगीरित्या म्हणजेच वैयक्तिक देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 17 नंबर फॉर्म (नावनोंदणी अर्ज) ऑनलाईन भरण्यासाठी भरण्यासाठी 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नाशिक बोर्डः दहावी, बारावी परीक्षा वैयक्तिक देण्यासाठी या तारखेपर्यंत अशी करा नावनोंदणी
एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
Follow us on

नाशिकः फेब्रुवारी – मार्च 2022 मध्ये होणाऱ्या 12 वी (HSC) आणि 10 वी (SSC) परीक्षा (EXAM) खासगीरित्या म्हणजेच वैयक्तिक देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 17 नंबर फॉर्म (नावनोंदणी अर्ज) ऑनलाईन भरण्यासाठी भरण्यासाठी 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली. (To do the 10th and 12th exams individually, do the registration till ‘this’ date)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षेचे नाव नोंदणी भरलेल्या अर्जाची विद्यार्थ्यांनी प्रिंट काढून 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र, शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करावी. तसेच संबंधित संपर्क केंद्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह 18 ऑक्टोबर 2021 रोजी संबंधित विभागीय मंडळात जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.sscboardnashik.com या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून सूचना व माहितीपत्रक देण्यात आले आहे. तसेच दहावीसाठी अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in व बारावीसाठी अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in याप्रमाणे संकेतस्थळ उपलब्ध आहे. इयत्ता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क एक हजार रुपये व प्रक्रिया शुल्क 100 रुपये व इयत्ता बारावीसाठी खासगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क पाचशे रुपये व प्रक्रिया शुल्क 100 रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे, असेही राजेंद्र अहिरे यांनी कळविले आहे.

कशा होणार परीक्षा?

कोरोनाचे रुग्ण काही जिल्ह्यात वाढताना दिसत आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या घरात गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये रुग्ण वाढत असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः प्रशासनाला लसीकरण वेगाने वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी सध्या कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. गर्दी जमविणे, मास्क न वापरणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. गर्दी जमविल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सोमवारी सहा नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी आणि कशा होणार, हे येणारा काळच ठरवेल. (To do the 10th and 12th exams individually, do the registration till ‘this’ date)

इतर बातम्याः

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

नाशिक पोलिसांचा हाबाडा; 6 नगरसेवकांवर गुन्हा, गर्दी जमवणे पडले महागात