AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटन दिन विशेषः प्रभू रामचंद्र वनवासात कुठल्या कुंडात स्नान करत, नाशिकला पश्चिम भारताची काशी का म्हणतात?

झाडांच्या गर्द सावलीनं झाकलेले रस्ते, स्वभावानं अतिशय प्रेमळ असणारी माणसं आणि शहराच्या मधोमध वाहणारी गोदामाय इतक्या साऱ्या वैभवानं नाशिक (Nashik) हे ऐतिहासिक शहर नटलंय. नाशिकला पश्चिम भारताची काशी म्हटलं जातं. पर्यटन दिनानिमित्त नाशिक शहरातल्या तीन ऐतिहासिक स्थळांची ही ओळख.

पर्यटन दिन विशेषः प्रभू रामचंद्र वनवासात कुठल्या कुंडात स्नान करत, नाशिकला पश्चिम भारताची काशी का म्हणतात?
नाशिकमधील गोदा तीरावरील पंचवटी परिसर.
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 4:01 PM
Share

नाशिकः झाडांच्या गर्द सावलीनं झाकलेले रस्ते, स्वभावानं अतिशय प्रेमळ असणारी माणसं आणि शहराच्या मधोमध वाहणारी गोदामाय इतक्या साऱ्या वैभवानं नाशिक (Nashik) हे ऐतिहासिक शहर नटलंय. नाशिकला पश्चिम भारताची काशी म्हटलं जातं. पर्यटन दिनानिमित्त नाशिक शहरातल्या तीन ऐतिहासिक स्थळांची ही ओळख. (Tourism Day Special: Introduction to three historical places in Nashik)

पंचवटी

नाशिक म्हटलं की अगोदर डोळ्यांसमोर येतो तो पंचवटी परिसर. गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर वसलेला. इथल्या काळाराम मंदिराजवळ पाच वड्यांच्या झाडांचा समूहय. त्यामुळं या भागाला पंचवटी नाव पडलं. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, नीळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तीळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशा अनेक मंदिरांनी पंचवटी भाग वेढलेलाय. यामुळंच नाशिकला पश्चिम भारताची काशी म्हटलं जातं. हे स्थळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून साधारणतः 24 किलोमीटरय. इथून रेल्वे स्थानक 10 तर मध्यवर्ती बसस्थानक फक्त 3 किलोमीटरय.

रामकुंड

पंचवटी परिसरतालंच एक ठिकाण म्हणजे रामकुंड. असं म्हणतात की, प्रभू रामचंद्र वनवासादरम्यान या ठिकाणी स्नान करत. या कुंडाजवळच अस्थिविलय तीर्थ आहे. या कुंडाचं बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केलं. श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली. राज्यभरातून दूरदूरचे भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थी या कुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक महान नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित केल्यात. हे स्थळही ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून साधारणतः 24 किलोमीटरय. इथून रेल्वे स्थानक 10 तर मध्यवर्ती बसस्थानक फक्त 3 किलोमीटरय.

पांडव लेणी

नाशिकमध्ये जवळपास अडीच वर्षांपूर्वीच्या जुन्या लेणी आहेत. पांडव लेणी म्हणून त्या ओळखल्या जातात. या लेणी परिसरात पाली भाषेतला एक शिलालेखय. त्यावरून ही लेणी दोन हजार वर्षांपूर्वींची असल्याचं समजलं जातं. येथे एकूण 24 लेणी आहेत. काही लेणी व त्यातील मूर्ती चांगल्या आहे. काही भंग पावल्यात. या लेणीत बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्ती आहेत. पाच पांडवसदृश मूर्ती, भीमाची गदा, कौरव मूर्तीही आहेत. इंद्रसभा आणि इतर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींची शिल्पकला मनाला भुरळ पाडते. हे स्थान नाशिकमधल्या नवीन बसस्थानकापासून 5 किलोमीटर आहे. येथून ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे. (Tourism Day Special: Introduction to three historical places in Nashik)

इतर बातम्याः

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

सोन्याहून सुंदर काहीच नाही, जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.