लहान भावाला वाचवताना थोरलाही बुडाला, पोळ्यावर दुःखाचे सावट!

नाशिक जिल्ह्यातील एरंडगाव (ता. येवला) येथे दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लहान भावाला वाचवताना थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याने गावावर आणि पोळा सणावर दुःखाचे सावट आहे.

लहान भावाला वाचवताना थोरलाही बुडाला, पोळ्यावर दुःखाचे सावट!
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एरंडगाव (ता. येवला) येथे दोन सख्ख्या भावांचा (Two brothers drowned) शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लहान भावाला वाचवताना थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याने गावावर आणि पोळा सणावर (Pola Festival) दुःखाचे सावट आहे. (Two brothers drowned, incidents in Nashik district,Sadness at the pola festival)

एरंडगाव येथील संतोष पुंडलिक जगताप यांना हर्षल (वय १४) आणि सार्थक उर्फ शिवा (वय १२) ही मुले आहेत. पोळा सणाच्या आदल्या दिवशी रविवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास हर्षल आणि सार्थक उर्फ शिवा ही दोन्ही मुले शेतात गेली होती. संतोष हे पोळ्याचा सण घेऊन पत्नीसह पाहुण्यांकडे गेले होते. जगताप यांच्या शेतात एक शेततळे आहे. या मुलांनी शेतात येताच आपला मोर्चा शेततळ्याकडे वळवला. सार्थक उर्फ शिवा हा कपडे काढून पोहण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खावू लागला. हर्षलने हे पाहताच भावाकडे झेप घेतली. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

हर्षल सातवीला, शिवा सहावीला

हर्षल आणि शिवा ही भावंडे साताळी जिल्हा परिषदेत अनुक्रमे सातवी आणि सहावीला होती. पोळा घेऊन गेलेले संतोष सायंकाळी पत्नीसह घरी आले. मात्र, घरात दोन्ही मुले नव्हती. त्यांनी त्यांचा शोध घेतला. शेवटी शेततळ्याच्या काठावर दोघांचे कपडे दिसले. त्यांनी तळ्यात शोध घेतला असता दोन्ही मुले पाण्यात सापडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी गावातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जगताप यांना दोन्ही मुलेच

संतोष जगताप यांना दोन्ही मुलेच होती. मुले शेततळ्यात बुडाल्याचे कळताच संतोष यांची आई, हर्षल-शिवाची आई आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घरात मुलांची वाट पाहणाऱ्या आजी आणि आईच्या या आकांताने गावाच्या काळजाचाही ठोका चुकला.

सण झालाच नाही

यंदा अर्धा पावसाळा झाला तरी म्हणावा तसा पाऊस नाही. काही भागात पाऊस पडतो, तर काही भाग कोरडे आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्यातच ऐन पोळ्याच्या आदल्या दिवशी एरंडगावात ही घटना घडल्याने गावातल्या पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले होते. (Two brothers drowned, incidents in Nashik district,Sadness at the pola festival)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा 

नाशकात तोतया विधानसभा उपाध्यक्षाला बेड्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI