AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या महाराष्ट्रात, बघून घ्या महाराष्ट्र, महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार’; उद्धव ठाकरे कडाडले

"काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कोकणात गेले. सिंधुदुर्गात. नौदल दिन होता. बरं वाटलं. बळेबळे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. लोकांना वाटलं काही तरी कोकणासाठी देईल. पण कसलं काय. तिकडे गेले, अन् पाणबुडी प्रकल्प पळवला. क्रिकेटची मॅचही तिकडे गेली. नाही तर आपण जिंकलो असतो", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

'या महाराष्ट्रात, बघून घ्या महाराष्ट्र, महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार'; उद्धव ठाकरे कडाडले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 23, 2024 | 8:27 PM
Share

नाशिक | 23 जानेवारी 2024 : “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाऱ्या महाराष्ट्रात वाढल्या. दोन-चार दिवसांनी येत आहेत. आता पोहरादेवीला येत आहेत. या. बघून घ्या महाराष्ट्र. हा महाराष्ट्रच मोदींना धडा शिकवणार आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी वारसा घेऊन निघालो आहे. दंगल झाली की पळणारी ही अवलाद आहे. आमच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्याचं पाय ताणून बसतात हे नालायक लोकं. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला इशारा दिला.

“एका बाजूला बंदोबस्तात राहणार. तुमच्या यंत्रणांचा पगार सामानान्यांच्या खिशातून जातात हे यंत्रणाने लक्षात ठेवावं. भेकड लेकाचे. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी. भेकडांची पार्टी आहे. स्वतमध्ये कर्तृत्व नाही. नेता तर देऊ शकत नाही. भाकड तर आहातच पण भेकडही आहात. आणि म्हणे हिंदुत्ववादी. हे कुठलं हिंदुत्ववादी?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘तिकडे गेले, अन् पाणबुडी प्रकल्प पळवला’

“मिंधे मिंधे जे बोलतातना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय, तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत आहे. शेपूट हलवत बसतोय खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार? हे बाळासाहेबांचं हिंदुत्व? काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कोकणात गेले. सिंधुदुर्गात. नौदल दिन होता. बरं वाटलं. बळेबळे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. लोकांना वाटलं काही तरी कोकणासाठी देईल. पण कसलं काय. तिकडे गेले, अन् पाणबुडी प्रकल्प पळवला. क्रिकेटची मॅचही तिकडे गेली. नाही तर आपण जिंकलो असतो”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“आता तर मधल्या काळात हेच लोकं बोंबलून ओरडत होती ना बॉयकॉट बॉलिवूड. काल बॉलिवूडच होते. शंकराचार्य नाही. हे यांचं थोतांड. आता फिल्मफेअरचा सोहळाही गुजरातला घेऊन जात आहे. महसूल मिळण्याची ठिकाणं गुजरातला नेत आहे. महाराष्ट्राने असं काय पाप केलंय की आमच्या मुळावर येत आहात. महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालत आहे का. मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडला हे सांगा. तुम्ही सांगा. मी आहे ते पद सोडायला तयार आहे, जसं मुख्यमंत्रीपद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इकडे येऊन बोल मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कुणाची”, अशा खोचक शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच