Malegaon | स्मशानभूमी अभावी अक्षरशः भरपावसात चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यविधी, प्रेतांची होणारी अवहेलना कधी थांबणार?
साबरदरा येथे एका वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र, सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. साबरदरा येथील स्मशानभूमी तीन किलोमीटर अंतरावरील कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तिथे जाण्यासाठी रस्ताही नसल्याने भरपावसात प्रेत कसे न्यायचे हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा होता.

मालेगाव : चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन कसे बसे सरण रचत चितेला मुखाग्नी देण्याची धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं. नाशिकच्या (Nashik) सुरगाणा आदिवासी बहुल तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायत हद्दीतील साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी अक्षरशःभरपावसात चक्क प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यविधी उरकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीत शेड व रस्ते (Sheds and roads in the cemetery) उभारावे व प्रेतांची होणारी अवहेलना आता तरी थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पावसाची संततधार सुरू असल्याने ग्रामस्थांसमोर मोठा प्रश्न
साबरदरा येथे एका वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र, सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. साबरदरा येथील स्मशानभूमी तीन किलोमीटर अंतरावरील कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तिथे जाण्यासाठी रस्ताही नसल्याने भरपावसात प्रेत कसे न्यायचे हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा होता. कारण स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्त्या देखील नाहीयं आणि स्मशानभूमीत पत्राचा शेड देखील नसल्यामुळे ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे होते.
सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार
पाऊस सुरू असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधी करणे तर शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शेताच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन कसे बसे सरण रचत चितेला मुखाग्नी दिला. पावसाळ्यात स्मशानभूमी शेड व रस्ता नसल्याने प्रेताला मरणानंतरही अवहेलना सोसावी लागते. ग्रामीण भागात प्रत्येक गावात स्मशानभूमी शेड व रस्ते उभारावे व प्रेतांची होणारी अवहेलना थांबवावी अशी मागणी होत आहे.
