Satara murder | सातारा जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला, एका वृद्ध दाम्पत्याची केली हत्या!
विसापूर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध पती-पत्नी यांचा खून दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती, घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली असता पती-पत्नीचे मृतदेह जमिनीवर पडलेले पाहायला मिळाले.

सातारा : सातारा (Satara) जिह्यात एक धक्कादायक घटना घडलीयं. एका वृद्ध दाम्पत्याची अज्ञात लोकांकडून हत्या (Murder) करण्यात आलीयं. हनुमंत भाऊ निकम 70 वर्ष आणि कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीची हत्या झाली करण्यात आली आहे. मात्र, अद्याप यांच्या हत्येमागील कारण कळू शकले नाहीयं. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडालीयं. या खुनाची नोंद पुसेगाव पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केलायं. धक्कादायक बाब म्हणजे या खुनाची माहिती तब्बल दोन दिवसांनंतर समजली.
पती-पत्नीचे मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत
विसापूर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध पती-पत्नी यांचा खून दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती, घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली असता पती-पत्नीचे मृतदेह जमिनीवर पडलेले पाहायला मिळाले. यादरम्यान कमल हनुमंत निकम यांच्या गळ्यातील दागिने देखील लंपास झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुसेगाव पोलीसांनी सुरू केला पुढील तपास
ही घटना शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पुसेगाव पोलीस घटनास्थळावर आले घटनास्थळावरून पंचनामा केला व त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी सातारा येथे हलवण्यात आले. या संदर्भात हा डबल मर्डर नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी केला ही अद्यापही माहिती समोर आली नाही. याबाबत अधिक तपास पुसेगाव पोलीस करत आहे.
