बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुस्लीम समाजाचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानी करण्याची सूट देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली (Nasim Khan on Bakri Eid) आहे.

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुस्लीम समाजाचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानी करण्याची सूट देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली (Nasim Khan on Bakri Eid) आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा सण ईद ऊल अदाह (बकरी ईद) आहे. या दिवशी मुस्लीम समाज बकऱ्यांची कुर्बानी देतो. यादिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खान यांनी पत्र लिहिलं (Nasim Khan on Bakri Eid) आहे.

कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

“मुस्लीम समाजाचा महत्वाचा बकरी ईद सणादिवशी कुर्बानी करणे अनिवार्य (वाजिब) असते. दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात संपूर्ण जगात हा सण मुस्लीम बांधव साजरा करत असतात.”, असं नसीम खान यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केल्याने अनेक सण आणि धार्मिक उत्सव साजरे करता आले नाही. असे असतानाही कोविड काळात काही शर्तींच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु बकरी ईद या मुस्लीम समाजाच्या महत्वाच्या सणाविषयी आत्तापर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील मुस्लीम समाज आणि मुस्लीम संघटनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे नसीम खान यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना कळवले.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रम, सण आणि उत्सव यावरही सरकारने बंदी घातली आहे. नुकतेच सरकारने गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आदेश गणेश मंडळांना दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Ramzan Eid : ईद साधेपणे करुन गरिबांना मदत करा, मनमाडच्या मौलानांचे मुस्लीम बांधवांना आवाहन

Lockdown | लॉकडाऊनचं पालन करत भायखळ्यात मुस्लिम बांधवांकडून घरातूनच ईद साजरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *