महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ यांची 3 मुलांसह थेट किल्ल्याहून उडी, वडिलांनी थेट..

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News : कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी घेतलेल्या निर्णयाने मोठी खळबळ उडाली. त्यांनी थेट आपल्या तीन मुलांसह आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. सध्या एका मुलीवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ यांची 3 मुलांसह थेट किल्ल्याहून उडी, वडिलांनी थेट..
Wrestler Ashwini Mohite Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 9:28 AM

धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एका मुलीवरती धाराशिव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्विनी पौळ या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने असे धक्कादायक पाऊल का उचलले असा सवाल केला जात आहे. आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट दरीत त्यांनी उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली.

अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुळ्या मुलींपैकी असलेली वीर गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. अश्विनी मनोहर पौळ या कुस्तीपटू होत्या. महाराष्ट्राची वाघीण म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी उचललेल्या या पावलाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पण अश्विनी यांनी हे पाऊल नक्की का उचलले असा सवाही उपस्थित होत आहे.

क्रीडा विश्वाला धक्का बसलाय. त्यातच अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. नवरा आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने जीवनाचा शेवट केल्याचे अश्विनी यांच्या वडिलांनी सांगितले. पोलिस या घटनेची चाैकशी करत आहेत. अश्विनी याच नाही तर त्यांचे वडील, भाऊ, आई आणि बहिणी देखील कुस्तीपटू आहेत.

वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी मुलींना तालिम दिली. तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, गुरुदासपूर आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावले सुवर्ण पदक. दरम्यान, या घटनेनंतर नळदुर्ग किल्ल्यातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपळी बुरुजासारख्या धोकादायक ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का? नाही असा सवाल उपस्थित होत आहे.नळदुर्ग पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us