AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मात्र पॉपकॉर्न… राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंथन शिबिरात कुणी केली टीका ?

महाराष्ट्रामधील रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात असल्याचे सांगत, मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिल्याचे भुजबळ म्हणाले.

गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मात्र पॉपकॉर्न... राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंथन शिबिरात कुणी केली टीका ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 05, 2022 | 8:57 PM
Share

शिर्डी : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे मंथन शिबिर पार पडत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शिबिर पार पडले. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन करत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी राज्यातील प्रकल्प गुजरात गेल्याच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी गुजरातला फॉक्सकॉन आणि महाराष्ट्राला पॉपकॉन असा टोला लगावत जहरी टीका केली. मंथन शिबिरात बोलत असतांना छगन भुजबळ यांनी फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेंव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणु असे म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबस चा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बस चा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला असं म्हणत भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारचा समाचार घेतला.

महाराष्ट्रामधील रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात असल्याचे सांगत, मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिल्याचे भुजबळ म्हणाले.

याशिवाय टाटा यांना पत्रात म्हंटलं होतं की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएल च्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा अशी मागणी केल्याचे भुजबळ म्हणाले.

मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचा दावा भुजबळांनी मंथन शिबिरात केला आहे.

आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला असा टोला लगावत भुजबळांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.