नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी सरकारची कारवाई; एक अधिकारी निलंबित

याठिकाणी 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. | navi mumbai covid testing centre

नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी सरकारची कारवाई; एक अधिकारी निलंबित
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:13 PM

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील (covid testing centre) घोटाळाप्रकरणी सरकारकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून शुक्रवारी याप्रकरणी एका मनपा अधिकाऱ्याला निलंबित केले. (Major scam in Navi Mumbai Covid centre)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. योगेश कडूसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशीअंती मनपाचे आरोग्य अधिकारी आणि टेस्टिंग इनचार्ज डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित केले. तसेच दोन आठवड्यात याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले.

काय आहे हा घोटाळा?

राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये (Covid Testing Centre) हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. अधिक चौकशी केली असता या कोव्हिड टेस्टिंग सेंटरमध्ये गावाल गेलेल्या आणि मृत लोकांचे अहवाल दाखवून शासनाकडून पैसे लाटल्याचे स्पष्ट झाले. या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवून दाखविली जात असे.

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी मुंबईत कोल्ड स्टोरेजची तयारी

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजसाठी मुंबईत तयारी सुरु करण्यात आली आहे. कांजुर-भांडुप भागात एक जागा जवळजवळ निश्चित मानण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली.

मुंबईत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथील तीन जागांचा लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी विचार सुरु आहे. मात्र पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा निश्चित होत आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, ‘AIIMS’ संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....