तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. (bjp leader devendra fadnavis on permanent lockdown)

तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
devendra fadnavis

नवी मुंबई: कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (bjp leader devendra fadnavis on permanent lockdown)

देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत आले होते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाशी आपण सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजही दिले आहे. परंतु, भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहीम राबवणं हे कठिण काम होतं. आज आपण आपल्या देशात चार लसी तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो, असं फडणवीस म्हणाले.

लसीबाबत संभ्रम नको

कोरोना लसीवरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करणे गरजेचं आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसंकत्व येतं, असे संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, आता लसीचा प्रभाव लोकांच्या लक्षात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय कामगार मंत्र्यांना आणणार

माथाडी कामगार हा अतिशय कठिण परिस्थितीत काम करणारा आहे. त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे. नरेंद्र पाटील यांनी लसीकरणासाठी चांगला प्रयत्न केला आहे. एनजीओच्या माध्यमातून मी स्वत: माथाडी कामगारांच्या लसीकरणासाठी दहा हजार लसी देईल. माथाडी कामगार स्वस्थ राहिला पाहिजे, असं ते म्हणाले. विदर्भ हे माझे कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे माथाडी चळवळ किती महत्त्वाची आहे, याचं महत्त्व मला नरेंद्र पाटील यांनी पटवून दिलं. त्यामुळेच येत्या 23 सप्टेंबर रोजी केंद्रीय कामगार मंत्री नवी मुंबईत आणण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नरेंद्र पाटील भावूक

दरम्यान, यावेळी नरेंद्र पाटील भावूक झाले होते. आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी मिळवून दिला. मराठा समाजाला उद्योगासाठी कर्ज मिळावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा. अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशीर्वादात ठेवा, असं भावनिक आवाहन पाटील यांनी केलं. (bjp leader devendra fadnavis on permanent lockdown)

 

संबंधित बातम्या:

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा सुरू, हजारो लोक एकवटले; 5 सप्टेंबरला जलसमाधी घेणार!

(bjp leader devendra fadnavis on permanent lockdown)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI