कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण, डॉ. मनीष त्रिपाठीसह 2 जणांवर गुन्हा दाखल

कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईत देखील बोगस लसीकरणाचा प्रकार समोर आला आहे. या बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंडचं नाव डॉ. मनीष त्रिपाठी असं आहे.

कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण, डॉ. मनीष त्रिपाठीसह 2 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 4:06 AM

नवी मुंबई : कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईत देखील बोगस कोरोना लसीकरणाचा प्रकार समोर आला आहे. या बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंडचं नाव डॉ. मनीष त्रिपाठी असं आहे. त्याच्यासह आणखी 2 जणांवर नवी मुंबई तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी येथील कंपनीत लसीकरण दरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे उघड झाले आहे. बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार 536 रुपये उकळले होते (Bogus Corona vaccination in Navi Mumbai police arrest doctor).

लसीकरणाचे 4 लाख 24 हजार 536 रुपये घेतले

याबाबत नवी मुंबई नेरुळ येथे राहणाऱ्या फिर्यादी कल्पेश पद्माकर पाटील यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटील काम करत असलेल्या अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केइसीपी हेल्थ केअर रुग्णालयाचे डॉ. मनीष त्रिपाठी, करीम आणि आणखी एक व्यक्ती यांनी संगनमताने प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी यांची नेमणूक न करता खोटे लसीकरण केले. तसेच लसीकरणाचे 4 लाख 24 हजार 536 रुपये घेतले. डॉक्टर प्रशिक्षित असल्याचे भासवून नानावटी रुग्णलयात वेगळ्या तारखांना ऑनलाईन माहिती भरून 2 जणांना प्रमाणपत्र देत ते खरे असल्याचे भासवले. उर्वरित 350 लोकांना प्रमाणपत्र न देऊन फसवणूक केली आहे.

लसीकरण केल्याचे बनावट प्रमाणपत्र वाटप

शिरवणे एमआयडीसीमधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते. 23 एप्रिलला हे शिबीर भरवले असता त्यावेळी कंपनीतल्या 352 कामगारांचे लसीकरण करून 4 लाख 24 हजार रुपये उकळण्यात आले. याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.

कंपनीकडून तक्रारीनंतर पोलिसांची डॉक्टरवर कारवाई

यानुसार कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्याआधारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरु होता. यामध्ये कंपनीच्या 352 कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले. कांदिवली, नवी मुंबईसह इतर कोणकोणत्या ठिकाणी असे बोगस लसीकरण झाले आहे. याबाबत डॉ. त्रिपाठी याला अटक झाल्याने त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकणार; आरोग्य विभागाची मंजुरी

केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप

व्हिडीओ पाहा :

Bogus Corona vaccination in Navi Mumbai police arrest doctor

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.