केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप

लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खाजगी लोकांना आणि खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.

केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 3:33 PM

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे. मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने ही घटना घडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खाजगी लोकांना आणि खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik criticizes the central government over the issue of bogus vaccination)

सुरुवातीपासून जर खाजगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या. त्यामुळे अशाप्रकारचा बोगसपणा झाला नसता, असा टोला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. त्याचबरोबर ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दात मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावरही नाराजी व्यक्त केलीय.

मुंबई पोलिसांकडून बोगस लसीकरणाचा पर्दाफाश

मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केली होती. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संदर्भात महत्वाची माहिती देण आवश्यक होतं. यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बनावट औषधांसदर्भातले गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमे ही टाकलेली आहेत. कांदिवलीत त्या गुन्ह्यात आठ आरोपींना अटक करून 12 लाख जप्त केले आहेत. मुख्य आरोपींच्या बँकेची खाती गोठवण्यात आल्याचंही नांगरे-पाटील यांनी सांगितलं होतं.

बारामतीतून एक आरोपी अटकेत

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे या आरोपीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण केलं जातं होतं. याबरोबरच हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या :

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

‘त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार’, मलिकांचा भाजपला इशारा

Nawab Malik criticizes the central government over the issue of bogus vaccination

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.