स्थळ पाहणी केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये; महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेची महापालिका आयुक्तांना विनंती

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मतदान याद्यांची अंतिम प्रत बनविण्याच्या अगोदर सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. यानुसार हजारो हरकती मनपा प्रशासनाकडे विविध पक्षांनी, नगरसेवकांनी लेखी स्वरूपात दिल्या होत्या.

स्थळ पाहणी केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये; महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेची महापालिका आयुक्तांना विनंती
स्थळ पाहणी केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये; महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेची विनंती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात लागण्याची चिन्हे आहेत. त्यात नवी मुंबईतील मतदार यादीत घोळ असल्याचे सेना भाजपने म्हटले होते. त्यात आता मनसेने सुद्धा उडी घेतली आहे. स्थळ पाहणी केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी विनंती मनसेच्या माथाडी सेनेने केली आहे. मनसेच्या माथाडी सेनेचे गणेश म्हात्रे यांनी याबाबत आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. (Elections should not be held without site inspection; Request of Maharashtra Navnirman Mathadi Kamgar Sena)

मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस नावे

मतदार यादीत प्रचंड घोळ असून मोठ्या प्रमाणत बोगस नावे आहेत तसेच मृत्यू आणि स्थलांतरित झालेल्यांची नावे रद्द केल्याशिवाय मतदार यादी फायनल करू नका. यासाठी स्थळ पाहणी अहवाल करणे गरजेचे आहे. अद्याप स्थळ पाहणी अहवाल झालेला नाही ते झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी विनंती मनसेने केली आहे. मात्र आयुक्तांनी आम्हाला या विषयावर चांगला प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ”स्थळ पाहणी अहवाल आल्याशिवाय आम्हाला निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करता येणार नाही. स्थळ पाहणीचा अहवाल आम्ही आयोगाला पाठवू आणि त्यानंतरच निवडणुका जाहीर होतील” असे आयुक्तांनी सांगितल्याचे गणेश म्हात्रे यांनी पत्रकारांना सांगितले.

मतदार यादीत 90 हजार बोगस नावे टाकल्याचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मतदान याद्यांची अंतिम प्रत बनविण्याच्या अगोदर सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. यानुसार हजारो हरकती मनपा प्रशासनाकडे विविध पक्षांनी, नगरसेवकांनी लेखी स्वरूपात दिल्या होत्या. याबाबत योग्य ते पुरावे तपासून, मतदारांच्या घरी जावून प्रत्यक्ष मतदार संबंधित पत्त्यावर राहतात का? याची खातरजमा करूनच त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट किंवा बाद करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र आता मतदान यादीतील घोळ कधी संपेल आणि निवडणुका कधी लागतील हे पाहावं लागेल. याआधी राष्ट्रवादी आणि भाजपाने मतदान यादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी वर्गाने लाखो रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गणेश नाईक आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. (Elections should not be held without site inspection; Request of Maharashtra Navnirman Mathadi Kamgar Sena)

इतर बातम्या

महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे नीती आयोगाकडून कौतूक, केंद्राने अधिक प्रोत्साहन द्यावे; आदित्य ठाकरेंची मागणी

दूरसंचार क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी, अनेक मोठ्या पॅकेजेसची घोषणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI