AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग, नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केटला फटका, भाजीपाल्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले

पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी (Navi Mumbai APMC) भाजी मार्केटला फटका बसला आहे. भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत. उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यानं शेतमाल पडून आहे.

महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग,  नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केटला फटका,  भाजीपाल्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले
नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर उतरले
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 10:45 AM
Share

नवी मुंबई : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2021) पाऊस दाखल झालेला आहे. दोन दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी (Navi Mumbai APMC) भाजी मार्केटला फटका बसला आहे. भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत. उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यानं शेतमाल पडून आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मात्र ग्राहक नसल्यानं मालाला उठाव नाही. (Heavy Rainfall in two and three days caused to vegetable prices down in Navi Mumbai APMC)

मुंबईत जाणारा भाजीपाला गेलाच नाही

मुंबईसह उपनगरात जाणारा भाजी पाला मार्केट बाहेर गेलाच नाही. आज नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या 374 गाड्या आल्या. दोन तीन दिवसांपासून भाजीपाल्याला उठावन नसल्यानं 10 ते 15 टक्के पालेभाज्या, फळभाज्या खराब झाल्या आहेत.

बाजारसमितीत भाजीपाल्याची आवक, ग्राहक पोहोचले नाहीत

हवामान खात्याच्या अतिवृष्टीचा इशारा नंतर पावसाचा फटका हा भाजी मार्केट ला सुद्धा बसलेला आहे. नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी मार्केट मध्ये शेतमालाची आवक झाली. मात्र,पावसामुळे ग्राहक बाजारात पोहोचू शकला नाही. त्यामुळे शेतमाल मार्केट मध्ये तसाच पडून आहे. तसेच भाज्यांचे दर हे कमी झालेले पाहायला मिळाले.

पावसाचा भाजी मार्केटला फटका

एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक ही जास्त होती मात्र कोरोना काळामध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली. त्यात दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सुद्धा भाजी मार्केटला बसला आहे. त्यामुळे बराचसा शेतमाल बाजारात पडून असल्याचं एपीएमसी भाजी मार्केटचे उपसचिव सुनील सिंगटकर यांनी टीव्ही 9 शी मराठी शी बोलताना सांगितले.

भाजीपाला 100 किलो माल किमान कमाल सरासरी
बीट 100 किलो100016001300
भेंडी नं १ 100 किलो300040003500
भेंडी नं २ 100 किलो150025002000
भोपळा (डांगर) 100 किलो120016001400
दुधी भोपळा 100 किलो200030002500
चवळी शेंगा 100 किलो360040003800
ढेंमसे100 किलो400050004500
फरसबी 100 किलो80001200010000
फ्लॉवर100 किलो140016001500
आवळा100 किलो350055004500

नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

काल रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबई पनवेल मध्ये सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळाला. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. रायगड मध्ये ऑरेंज अलर्ट जारी केल्या नंतर रायगड सह पनवेल मध्ये आत्यवश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

VIDEO: ‘गुप्ता, मला पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो, पोलीस मुख्यालयाचं काम छा-छू झालंय’

(Heavy Rainfall in two and three days caused to vegetable prices down in Navi Mumbai APMC)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.