शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर (prashant kishor) शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच.

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; 'ते' 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!
sharad pawar
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:00 AM

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच. त्यातही भाजपानं उत्तर प्रदेशसह चार एक वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांचीही आताच तयारी सुरु केलीय. त्यामुळेच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आहेच. हे दोघे भेटतील तर नेमकी कशाची चर्चा होऊ शकते? अर्थातच भूतकाळात न जाता ते भविष्यकाळाच्या प्लॅनिंगर जास्त भर देतील हे निश्चितच. त्यामुळे ढोबळपणे आम्ही पाच मुद्दे काढलेले आहेत ज्यावर चर्चा होईल असं वाटतं. पाहुयात ते 5 मुद्दे. (Prashant Kishor to meet Sharad Pawar today, will discuss 5 key points)

1. यूपीएचे नेतृत्व कुणी करावं?

हा एक मोठा मुद्दा आहे ज्यावर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी काही नेत्यांकडून होत आली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आल्यापासून ह्या चर्चेनं जोर धरला आहे. शरद पवारांनीच यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. पण दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणं ममता बॅनर्जींनी मोदी-शाह जोडीला पराभूत केलं ते पहाता, ममता बॅनर्जींच्या नावाचीही मागणी पुढे येत आहे. प्रशांत किशोर यांनी ममतांसाठी काम केलं आहे. त्यामुळेच ममता की शरद पवार या प्रश्नावर दोघांची चर्चा होऊ शकते. शरद पवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर करतील असं दिसतं आहे.

2. भाजपची सध्याची स्थिती

प.बंगाल जिंकण्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून भाजपनं स्वत:ची सर्व ताकद पणाला लावली होती. केंद्रीय मंत्री, खासदार मंडळींपासून ते संघायचे स्वयंसेवक ममतांच्याविरोधात उभे ठाकले होते. तरीही ते ममतांचा पराभव करु शकले नाहीत. याचाच अर्थ असा की, मोदी-शाह म्हणजे सत्ता मिळणारच हे गणित आता राहीलेलं नाही. त्यातच प्रशांत किशोर यांनी ज्या विश्वासानं निकाला आधीच निकाल सांगितलेला होता ते पहाता, त्यांना भाजपची नस कळल्याचं दिसतं आहे. त्यामुळेच भाजपची सध्याची स्थिती काय, कमकुवत दुवे कुठले, ताकद कुठली अशा सगळ्या गोष्टीवर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.

3. महाराष्ट्राचं राजकारण

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राचं राजकीय मॉडेल देशातच अफलातून मानायला हवं. कारण ह्या मॉडेलमध्ये भाजपचा पारंपारिक मित्र असलेला शिवसेना वेगळा होऊन विरोधी विचारसरणीच्या काँग्रेससोबत एकत्र आला. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते. अलिकडच्याच दिल्ली भेटीत मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकांतात भेट झाल्याची चर्चा आहे. तसच कालच शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष असल्याचं सर्टीफिकेट दिलेलं आहे. पवार जे म्हणतात ते नेमकं राजकारणात उलटं घेतलं जातं. ह्या सगळ्यांची चर्चाही ह्या दोन दिग्गजांच्या भेटीत होऊ शकते.

4. बंगालचा ममतांचा विजय

अलिकडेच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत भाजपला फक्त आसाममध्ये सत्ता मिळेल असं भाकित शरद पवारांनी केलं होतं. झालंही तसेच. पश्चिम बंगालमध्ये तर ममतांच्या विजयाची जबाबदारीच प्रशांत किशोर यांच्यावर होती. ज्या पद्धतीचं कँपेन भाजपानं पश्चिम बंगालमध्ये राबवलं ते पहाता ममतांचा विजय वाटतो तेवढा सोप्पा नव्हता. पण मग असं काय केलं गेलं की ममतांनी मोदींना मात दिली? बंगाल जो विचार करतो, तो नंतर देश अवलंबतो असं म्हटलं जातं. त्याच लाईनवर दोघांमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते.

5. उत्तर प्रदेशच्या निवडणूका

देशात आगामी विधानसभा निवडणुका आता उत्तर प्रदेशच्याच आहेत. ज्याची उत्तर प्रदेशात सत्ता त्याचाच पंतप्रधान हे आतापर्यंतचं देशातलं राजकीय गणित राहीलेलं आहे. त्यामुळेच भाजपानं उत्तर प्रदेश राखण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्ली ते लखनौ अशा रोज बैठका पार पडत आहेत. त्यात संघाचं पाठबळही मोठं आहे. याच उत्तर प्रदेशच्या राजकीय गणिताची चर्चाही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात होऊ शकते. (Prashant Kishor to meet Sharad Pawar today, will discuss 5 key points)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.