AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळाच्या विकासकाचा मालकी हक्क GVK कडून ‘या’ कंपनीकडे, सरकारचा मोठा निर्णय

सध्या राज्यात गाजत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालकी हक्काबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

नवी मुंबई विमानतळाच्या विकासकाचा मालकी हक्क GVK कडून 'या' कंपनीकडे, सरकारचा मोठा निर्णय
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 7:37 PM
Share

नवी मुंबई : सध्या राज्यात गाजत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालकी हक्काबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार नवी मुंबई विमानतळाचे विकासकाचे मालकी हक्क जीव्हीके समुहाकडून (GVK Group) अदानी समुहाकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात अदानी समुह या विमानतलाचा विकास करेल हे स्पष्ट झालंय (Maharashtra Government change development ownership of Navi Mumbai internation airport from GVK group).‌

नवी मुंबई येथे 1160 हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यातील 1160 हेक्टर जमिनीचे भुसंपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा 2023-24 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत.

या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये नुकताच बदल झाला असून यापूर्वी या कंपनीमध्ये 50.5 टक्के सहभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर लि. या कंपनीचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. यांनी घेतलेले आहेत. या बदलास केंद्र शासनाच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. तसेच सिडको संचालक मंडळाने देखील मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे.

याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प नियंत्रण व अंमलबजावणी समितीने निर्देशित केल्याप्रमाणे या मालकी हक्कात बदल करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.

नवी मुंबई विमातळाची वैशिष्ट्ये

या विमानतळात एकमेकांशी जोडलेले 3 टर्मिनल असतील. याच्या केंद्रस्थानी सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स असणार आहे. हे विमानतळ दरवर्षी जवळपास 9 कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकेल असंही सांगण्यात आलंय. या विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी प्रवेशद्वार असणार आहे. हे विमानतळ एकूण 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या बांधण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची लँडिंग आणि टेकऑफ एकाचवेळी करता येऊन विमानांची अधिक सोय होईल आहे.

विमानतळापर्यंत लोकल रेल्वे, मेट्रोचीही कनेक्टिव्हीटी असणार

विशेष म्हणजे या भागातील प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहचण्याची वेगवान वाहतूक व्यवस्था असावी म्हणून एक्सप्रेस हायवेपासून सबअर्बन रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीचीही व्यवस्था केली जाणार आहे. 9+9 रेल्वेमार्गाचं सेंट्रल रेल्वे टर्मिनल उभारण्याचंही नियोजन करण्यात आलंय. या विमानतळात 88 चेक इन पॉईंट्स असणार आहेत. याशिवाय 26 इमिग्रेशन डेस्क, 29 एरोब्रिजेसही असणार आहेत.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याबाबतचा वाद काय?

दरम्यान, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचलं आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात.

दि. बा. पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही का?

पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बा. पाटील यांची कारकिर्द राहिली आहे. त्यांनी आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचं कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावं यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी म्हणून नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

VIDEO: कमळाचं डिझाईन, अद्ययावत सुविधा, पाहा कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Government change development ownership of Navi Mumbai internation airport from GVK group

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.