AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला वेळ लागणार?; गिरीश महाजन म्हणतात, वॉर लेव्हलवर येऊ नका!

एकनाथ खडसे हे का स्वतः ला मुख्यमंत्री म्हणून घेत आहे ते कळत नाही. मुंगेरीलाला के हसीन सपने खडसे पाहत आहेत. खडसे यांना कोण मुख्यमंत्री करणार होतं तेच कळतं नाही. तुम्हाला सात-आठ खात्याचा मंत्री केलं. त्यावेळी तुम्ही काय कमाल करून दाखवली हे संपूर्ण जगाला माहीत आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला वेळ लागणार?; गिरीश महाजन म्हणतात, वॉर लेव्हलवर येऊ नका!
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 11:52 AM
Share

जळगाव | 23 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. उद्या ही डेडलाईन संपत आहे. 24 तारखेनंतर सरकारला एक तासही अधिकचा वेळ देणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासकरून सत्ताधारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र जरांगे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. वॉर लेव्हलवर येऊ नका. हातघाईवर येऊ नका, असा सल्ला देतानाच मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागू शकतो, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानुसार 40 दिवसांची मुदत नक्कीच संपत आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत शासन अतिशय सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा घाई गर्दीत करण्याचा विषय नाही. त्याला थोडा वेळ लागू शकतो. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. पुन्हा मराठा समाजाची निराश होऊ नये यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. 40 दिवस झाले एक तासही देणार नाही अशा पद्धतीने वॉर लेव्हलवर, हात घाईवर येऊ नका अशी जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

ताई, तुमच्या पक्षाची काळजी करा

देवेंद्र फडणवीस यांचं सतत डिमोशन होत असल्याने मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रियाताई तुम्ही आमची काळजी करू नका. तुमच्या पक्षात काय चाललं आहे ते पहा. आपल्या पक्षामध्ये आता कोणीच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा. तुम्ही शरद पवार साहेबांची काळजी करा. आमच्या फडणवीस साहेबांची काळजी करू नका. आमचा पक्ष हा देशातला नंबर वन पक्ष आहे. तुमच्याकडे जे चार-पाच लोक राहिले आहेत त्यांची काळजी करा, असे टोले महाजन यांनी लगावले.

माझ्याकडे चोरीचे उतारे नाहीत

यावेळी एकनाथ खडसे यांच्यावरही त्यांनी टीका केली. सध्या खडसेंना पुष्पा सिनेमातील संवाद आठवत आहेत. त्यांचा कोणत्याही पद्धतीने छळ करण्यात आलेला नाही. त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी पटवून द्यावं. न्यायालयात जावं. तुमचं सरकार असताना माझ्यासाठी तुम्ही कमी मेहनत घेतली का? तुम्हाला माझ्या मालमत्तेची चौकशी करायची असेल तर करा. माझ्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे चोरीचे उतारे नाहीत. मी काही त्यांच्यासारख्या जमिनी घेतलेल्या नाहीत, असा हल्लाबोलच महाजन यांनी केला.

त्यावेळी आम्ही म्हणालो नाही

तुम्ही सुद्धा काँग्रेसचे हरिभाऊ जावळे यांच्या मागे पिशवी घेऊन फिरत होता. त्यानंतरच 1990 मध्ये काँग्रेसमध्ये असताना आमदार झाला होता. तुम्ही तुमचे सर्व कसब लावून चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे त्याचे उत्तर तुम्ही द्या. तुम्ही तर आमचं काही नसताना आमच्यावर खोट्या केसेस नोंदवल्या. त्यावेळेस आम्ही न्यायालयात गेलो नाही. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप आम्ही केला नाही, अशी टीका त्यांनी केली.

म्हणून तुमचं नाव आलं

यावेळी त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्या तुम्ही सुनबाई आहात, त्यामुळे त्या प्रकरणात तुमचं नाव आलं. खडसे नाव आहे म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे असं समजण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.