Nalasopara Fir: घराला आग, 14 व्या मजल्यावर चार जण जीवाच्या आकांताने 45 मिनिटं लटकले… नालासोपाऱ्यातील काळजाचा ठोका चुकवणारा Video
Nalasopara Imperial Heritage FIR : नालासोपारा वसई लिंक रोडवरील इंपिरियल हाईट्स इमारतीमध्ये मध्यरात्री साडे बारा वाजता आग लागल्याची घटना घडली. या 14 मजली इमारतीमधील वरच्या मजल्यावरील नागरिकांनी अक्षरशः मृत्यूचे दर्शन घेतले. काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर आला आहे.

Nalasopara Imperial Heritage FIR : नालासोपारा वसई लिंक रोडवरील इंपिरियल हाईट्स इमारतीमध्ये मध्यारात्री साडेबारा वाजता आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीच्या घटनेत फाल्गुनी शाह (50) आणि अश्विनी पारकर(50) या दोघींचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेतील सहा जणांना उपचारांसाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुरामुळे गुदमरल्याने या दोन महिलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या 14 मजली इमारतीमधील वरच्या मजल्यावरील नागरिकांनी अक्षरशः मृत्यूचे दर्शन घेतले. काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर आला आहे.
जीवनाशी करार, मृत्यूशी लढ्याचा थरार
या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील एका घरात भीषण आग लागली. जीव वाचण्यासाठी या मजल्यावरील चार जणांनी इमारतीच्या बाहेरील गॅलरीतील जागेचा आधार घेतला. इतक्या उंचीवर चौघांनी प्राण एकटवून या संकटाचा सामना केला. वरच्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा भडकत असताना जीवाच्या आकांताने चौघांनी मध्यरात्री अक्षरशः मृत्यूचा सामना केला. हे चौघे रहिवाशी 40-45 मिनिटं मदतीसाठी ताटकळले. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या क्रेनच्या मदतीने या चारही जणांची सुखरूप सुटका केली. सुटकेच्या वेळेसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात अखेरच्या क्षणी हे चारही रहिवाशी जीव वाचवण्यासाठी लटकलेले दिसत आहेत.
सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले
नालासोपाऱ्यात 14 मजल्याच्या इमारतीमधील 13 व्या मजल्यावरील एका घरात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीचे लोळ दुसर्या मजल्यापर्यंत पोहचले होते. आग वाढतच असल्याने स्थानिक रहिवाशांनी आपला जीव मुठीत घेवून बाहेर पडले आहेत तर ३० ते ४० रहिवाशाना रेस्क्यू करून बाहेर काढले. नालासोपारा वसई लिंक रोडवरील इंपिरियल हाईट्स इमारती मध्ये मध्यरात्री साडे बारा वाजता ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किट ने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनेक रहिवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी चक्क इमारतीच्या बाहेरच्या गॅलरीचा ही आधार घेऊन आपला जीव वाचविला आहे.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच वसई विरार, मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन, तब्बल सहा तासा नंतर आगीवर नियंत्रण मिळविले आहे. इमारतीमधील रहिवाशांचे महापौर आजीव पाटील यांनी बाजूच्या हॉल मध्ये स्थलांतर केले आहे. ज्या इमारती मध्ये ही आग लागली होती ती इमारत चार ते पाच वर्षापूर्वीची आहे. नव्यानेच उभारलेल्या इमारतीत आग कशी लागली. त्यात फायर सिस्टम कार्यान्वित नव्हती का? तिला पालिकेने कशी परवानगी दिली यावर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
