AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काम आपण करतो पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात, जेजुरीमध्ये शर्मिला ठाकरे यांचं मोठं विधान

Sharmila Thackeray on Gyanesh Kumar: जेजुरीमध्ये मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाल्याचे मुंबईतील आंदोलनावरून समोर आले आहे.

काम आपण करतो पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात, जेजुरीमध्ये शर्मिला ठाकरे यांचं मोठं विधान
शर्मिला ठाकरे यांचा ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा
| Updated on: Oct 14, 2026 | 7:57 AM
Share

विक्रम वरे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या 15 दिवसांपासून देशातील विविध राज्यात मोठी आंदोलनं सुरू आहेत. दिल्ली तर आंदोलनाची रणभूमी ठरली आहे. काँग्रेसने गेल्या दहा दिवसात दिल्ली दणाणून सोडली आहे. तर कॉकरोच जनता पार्टीनेही सरकारला जेरीस आणले आहे. इकडे मुंबईत ठाकरे सेना आणि मनसेही निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मैदानात उतरली आहे. जोपर्यंत निवडणूक आयुक्तांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्रच राहणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. जेजुरीमध्ये मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आपण काम करतो पण…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी जेजुरी मध्ये बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती भाष्य केलं आहे.“काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; आता हे बंद करायचं आहे ” असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. काम करणारे आणि निवडून येणारे यांच्यातील फरक सांगताना शर्मिला ठाकरे यांनी हे भाष्य केलं आहे. शर्मिला ठाकरे या जेजुरी मध्ये एका कार्यकर्त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आल्या होत्या आणि त्यावेळी त्या बोलत होत्या.

जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोला

खरं काम करणाऱ्या माणसांसाठी आज तुम्ही जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोला, असेही शर्मिला ठाकरे पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाल्या. यंदा दुष्काळाचं मोठं संकट आहे. मी रस्त्यावर बघितलं सगळी पीकं जळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील भाव मिळत नसल्याची खंत शर्मिला ठाकरे यांनी बोलून दाखवली. त्यांनी हे संकट दूर होण्यासाठी आई अंबेला प्रार्थना करते, असे म्हटले.

दोन दिवसांपूर्वी सीजेपीच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मोठे आंदोलन पेटले. मुंबईत सीजेपी, उद्धव सेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. त्यात पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. आंदोलनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेच नाही तर तेजस ठाकरेही उतरलेले दिसले. शिवाजी पार्कवरील या आंदोलनाने निवडणूक आयोगाविरोधातील वातावरण चांगलेच तापवले.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा