AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ‘इलेक्ट्रिक ताफ्यात’ आणखी 25 बसेस! लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करणार

Navi Mumbai: नव्याने येणाऱ्या बसेस दोन टप्प्यात आणण्यात आल्या. 180 बसेसचे ऑपरेशन सुरळीत चालल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने आणखी 25 इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या 'इलेक्ट्रिक ताफ्यात' आणखी 25 बसेस! लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करणार
Electric Bus In New MumbaiImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 09, 2022 | 10:42 AM
Share

नवी मुंबई: नवी मुंबईला पर्यावरणपूरक ठरणारी इलेक्ट्रिक बस (Electric Bus)! नवी मुंबई महापालिकेला (New Mumbai) सुरुवातीला केंद्राच्या फम योजनेमधून 30 इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या. या बसेससाठी शिवसेनेच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा करण्यात आला होता. नव्याने आलेल्या या बसेसचे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आणखी 150 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश एनएमएमटीच्या ताफ्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. नव्याने येणाऱ्या बसेस दोन टप्प्यात आणण्यात आल्या. 180 बसेसचे ऑपरेशन सुरळीत चालल्यानंतर एनएमएमटी (NMT) प्रशासनाने आणखी 25 इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी 25 इलेक्ट्रिक बसेस दाखल

एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या 567 बसेस आहेत. या सर्व बसेस सुमारे 74 बस मार्गावर धावतात. प्रत्येक दिवशी एनएमएमटीच्या बसेसमधून सुमारे एक लाख 80 हजार प्रवासी प्रवास करतात. एकूण बसेसपैकी 293 बसेस डिझेलवर आणि 133 बसेस सीएनजीवर धावतात. 180 बसेस इलेक्ट्रिक आहेत. आता नवी मुंबईच्या परिवहन सेवेत आणखी 25 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. अर्थातच यामुळे इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. इलेक्ट्रिक बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नवी मुंबई पालिकेची पर्यावरणपूरक धाव यशस्वी झाली आहे.

निविदा प्रक्रिया सुरू करणार

इलेक्ट्रिक बसेसमुळे फक्त पर्यावरणाचा फायदा होत नाही तर इंधनामध्येही मोठी बचत होत आहे. एनएमएमटीच्या सर्वच बस मार्गावरील इलेक्ट्रिक बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी 25 इलेक्ट्रिक बसेस आणण्याची तयारी सुरू केली आहे. नव्याने येणाऱ्या या बसेससाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.