नवी मुंबईत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, लवकरात लवकर सुधारणा करा, ‘आप’ची महानगरपालिकेकडे मागणी

उघडी गटारे, तुटलेली झाकणे , उघडया इलेक्ट्रिक केबल्स असे अनेक दुरावस्था झालेले फोटो आम आदमी पार्टीकडे आहे.(Navi Mumbai AAP Party Letter on administration Neglect of civic amenities)

नवी मुंबईत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, लवकरात लवकर सुधारणा करा, 'आप'ची महानगरपालिकेकडे मागणी
नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई : नवी मुंबई मनपा हद्दीत कोपरखैरणे नोड मधील प्रभाग क्रमांक 45, 42, 35, 23 मधील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे, लोक प्रतिनिधींचे काही लक्ष आहे का ? असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. या ठिकाणी गटार आणि इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन बोर्डसची भयानक वाईट अवस्था झाली आहे. उघडी गटारे, तुटलेली झाकणे , उघडया इलेक्ट्रिक केबल्स असे अनेक दुरावस्था झालेले फोटो आम आदमी पार्टीकडे आहे. नुकतंच आपने हे सर्व फोटो विनंती अर्जासह प्रशासनाला दिले आहेत. (Navi Mumbai AAP Party Letter on administration Neglect of civic amenities)

नवी मुंबईत झालेल्या या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी कोपरखैरणे नोडचे वॉर्ड अध्यक्ष अभिषेक पांडे अध्यक्ष वॉर्ड २३, महादेव गायकवाड अध्यक्ष वॉर्ड ४५, नीना जोहरी अध्यक्ष वॉर्ड ४२, सुमती कोटियान अध्यक्ष वॉर्ड 38 यांनी याबाबतचा अर्ज केला आहे. तसेच याबाबत प्रशासानाकडून त्वरित कारवाई करावी, यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्याने धोका अधिक

कोपरखैरणे नोड मधील बरेचसे इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रिब्युशन बोर्ड्स हे उघडे पडलेले आहे. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आणि धोकादायक आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस आणि  पाणी त्यामुळे संभाव्य शॉर्ट सर्किट, आग, अपघात आणि जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी विनंती आपच्या अनेक नेत्यांनी केली आहे.

लवकरात लवकर दुरुस्ती करा

तसेच बऱ्याच नाल्यांवर झाकण नाही. तर काही नाले हे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यात पावसाळ्यात कचरा अडकून राहतो. त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता असते. तसेच अशुद्ध पाणी भरल्यामुळे आजारही होतात. तसेच अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या जर्जर रस्त्यांची, नाल्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

(Navi Mumbai AAP Party Letter on administration Neglect of civic amenities)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी आंदोलक आक्रमक, मात्र पोलिसांकडून परवानगी नाहीच

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट

नवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI