नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे, या मागणीला आता भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट
Praveen Darekar

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. जेआरडी टाटा यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. पण नवी मुंबईचा विकास दि. बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यांचं नाव द्यावं असा भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यानुसार विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्यावं, अशी भाजपची भूमिका आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले. (Name the Navi Mumbai International Airport after D B Patil, its A BJP’s Demand cleared by Praveen Darekar)

दरेकर म्हणाले की. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर समाज भूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे.

पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही भाजप पक्षाची भूमिका आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकरांचीही मागणी

नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागली आता जोर धरु लागली आहे. नवी मुंबई, पनवेल, कल्याण, ठाणे, रायगड या भागातील भूमिपूत्र या मागणीसाठी आंदोलन उभारलं आहे. या आंदोलनाला राज्यभरातील विविध संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नावही समाविष्ट झाले आहे. कारण नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यायला हवे, अशी मागणी वंचितने मांडली आहे.

मागणीला आरपीआयचादेखील पाठिंबा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA)दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. मागळी आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

(Name the Navi Mumbai International Airport after D B Patil, its A BJP’s Demand cleared by Praveen Darekar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI