बेलापूर इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, देवेंद्र फडणवीसांचे आदेश

नवी मुंबईतील बेलापूरमध्ये असलेल्या सेक्टर १९ मधील शाहबाज गाव या ठिकाणी असलेली एक इमारत कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

बेलापूर इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, देवेंद्र फडणवीसांचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 2:36 PM

Navi Mumbai building collapsed : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये असलेल्या सेक्टर १९ मधील शाहबाज गाव या ठिकाणी असलेली एक इमारत कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी नवी मुंबईतील बेलापूरमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेबद्दल वक्तव्य केले. नवी मुंबई भागात शहाबाजगाव येथे आज पहाटे 4 मजल्यांची एक इमारत कोसळल्याची घटना घडली असून त्यातील सुमारे 50 निवासींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 2 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 2 नागरिक दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एनडीआरएफची चमू लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीही केली सूचना

देवेंद्र फडणवीसांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करा, अशा सूचना नवी मुंबई मनपा आयुक्तांना केल्या आहेत. “शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी”, अशी सूचना मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे.

तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन द्या

एकनाथ शिंदे हे सध्या निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली येथे आहेत. या बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली. इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा इत्यादी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महापालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

दरम्यान नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बेलापूर सेक्टर १९ मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत कोसळली आहे. पहाटे ४.३० सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. एका रिक्षावाल्याच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.