नवी मुंबईत पालिकेच्या आदेशाला केराची टोपली, उशिरापर्यंत दुकानं सुरुच

कोरोना वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने सात दिवसांसाठी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु व्यावसायिकांनी सर्व निर्बंध झुगारुन दुकाने सुरुच ठेवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे | Navi Mumbai traders didnt follow the restrictions

नवी मुंबईत पालिकेच्या आदेशाला केराची टोपली, उशिरापर्यंत दुकानं सुरुच
पुण्यातील दुकाने बंद

नवी मुंबई : कोरोना वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने सात दिवसांसाठी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु व्यावसायिकांनी सर्व निर्बंध झुगारुन दुकाने सुरुच ठेवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे (Navi Mumbai traders didnt follow the restrictions and let the shops open after 8 pm).

नवी मुंबईमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महानगरपालिकेने 5 जुलैपर्यंत पुन्हा नवीन निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स आणि सिनेमागृह बंद केली आहेत. अत्यावश्यक सुविधा वगळून इतर सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

महानगरपालिका आणि पोलिसांनी शहरभर माईकवरुन व्यावसायिकांना आवाहन केले आहे. परंतु वारंवार दुकाने बंद ठेवल्याने व्यवसायाचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने रात्री 8 नंतरही सुरु ठेवली जात आहेत.

मंगळवारी नेरूळ परिसरात किराणा माल, हॉटेल आणि इतर दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु होती. अनेकांनी अर्धे शटर बंद करुन व्यवसाय सुरु ठेवला होता. सानपाडा रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने रात्री 8 नंतरही सुरु होती. स्टेशन समोर गर्दी झाली होती. शहरात सर्वच विभागात असे चित्र पहावयास मिळत होते.

कारवाईसाठी यंत्रणा अपुरी

महानगरपालिका व पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई होत नाही. कारवाई करण्यासाठी यंत्रणाही अपुरी आहे. प्रशासनासही गांभीर्य राहिले नसल्याची टीका होऊ लागली आहे. 90 टक्के नागरिक नियमांचे पालन करतात. परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा टक्के नागरिकांमुळे सर्व शहरवासीयांना फटका बसत आहेत. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Navi Mumbai traders didnt follow the restrictions and let the shops open after 8 pm

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत नवे निर्बंध, दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

पनवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे रास्तारोको आंदोलन, आंदोलक ताब्यात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI