खडू, पेन्सिल रुसले, रुसला माझा फळा…, गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा

पनवेलमधील श्रीराम महाजन हे कर्नाटक हायस्कुल चेंबूर येथे कला शिक्षक म्हणून गेली 21 वर्षे कार्यरत आहेत. श्रीराम महाजन गेल्या अकरा वर्षांपासून घरगुती गणपती आरास बसवत आहेत. महाजन यांच्या घरी गेल्या 11 वर्षांपासून गणपतीची मूर्ती आणि संपूर्ण सजावट ही इकोफ्रेंडली असते. तसेच, नेहमी ते आपल्या गणेश सजावटीतून समाजाला चांगला संदेश देत असतात.

खडू, पेन्सिल रुसले, रुसला माझा फळा..., गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा
Ganpati Decoration

पनवेल : पनवेलमधील श्रीराम महाजन हे कर्नाटक हायस्कुल चेंबूर येथे कला शिक्षक म्हणून गेली 21 वर्षे कार्यरत आहेत. श्रीराम महाजन गेल्या अकरा वर्षांपासून घरगुती गणपती आरास बसवत आहेत. महाजन यांच्या घरी गेल्या 11 वर्षांपासून गणपतीची मूर्ती आणि संपूर्ण सजावट ही इकोफ्रेंडली असते. तसेच, नेहमी ते आपल्या गणेश सजावटीतून समाजाला चांगला संदेश देत असतात. यावर्षी सुद्धा महाजन यांनी आपल्या गणेश सजावटीमधून संदेश दिला आहे.

‘खडू,पेन्सिल रुसले,रुसला माझा फळा
सांगा ना कधी भरेल माझी आवडीची शाळा?’

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मनातील प्रश्न श्रीराम महाजन यांनी आपल्या गणेश सजावटीतुन मांडला आहे. कोरोनाच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचे फार नुकसान झाले. आज दोन वर्षे होत आली तरी शाळा मात्र बंदच आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हरवत चालले आहे. म्हणून यावर्षी श्रीराम महाजन यांनी गणपती सजावटीतुन प्रशासनासमोर हा प्रश्न उभा केला आहे.

श्रीराम महाजन यांनी गणपती विराजमानासाठी साकारण्यात आलेला देखावा हा संपुर्णपणे इकोफ्रेंडली आहे आणि शालेय वस्तू वापरुन साकारण्यात आला आहे. हे देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. श्रीराम महाजन सांगतात की, ‘गणेश सजावटीतून नेहमीच मी समाजाला काही प्रबोधनात्मक संदेश देण्याचं प्रयत्न करत असतो. हा संदेश देत असताना पर्यावरणाला कोणती हानी होणार नाही याची काळजी घेत असतो.

श्रीराम महाजन यांनी आपल्या इकोफ्रेंडली गणेश सजावटीतून समाजासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या कल्पनेचे आणि कलेचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

बाप्पा पावला! वसईत विसर्जन करताना साडेपाच तोळे सोन्याचे बाशिंग हरवले; 12 तासानंतर सापडले

Ganesh Visarjan | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, 173 ठिकाणी कृत्रिम तलाव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI