Ganesh Visarjan | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, 173 ठिकाणी कृत्रिम तलाव

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत विसर्जनाची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठी 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 173 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

Ganesh Visarjan | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, 173 ठिकाणी कृत्रिम तलाव
ganpati_visarjan
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:21 AM

मुंबई : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत विसर्जनाची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठी 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 173 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करणार आहेत.

मुंबईत एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. तसेच, सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 10 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.

5 दिवसांच्या गणपती विसर्जनाचा मुहूर्त

? सकाळी : 06.01 ते 10.45 मिनिटे

? दुपारी : 05.03 ते 06.37 मिनिटे

? संध्याकाळी : 12.19 ते 10.54 मिनिटे

? रात्री : 1.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 15 सप्टेंबर)

संबंधित बातम्या :

गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती; माजी विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया

Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.