टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, फरार टँकर चालकाला पोलिसांच्या काही वेळातच बेड्या

टँकरच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तळोजा एमआयडीसीतील देना बँकेजवळील साई हॉस्पिटलसमोर सकाळी ही दुर्घटना घडली. (Tanker Two Wheeler Road Accident one Died At taloja Navi mumbai)

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, फरार टँकर चालकाला पोलिसांच्या काही वेळातच बेड्या
टँकरच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तळोजा एमआयडीसीतील देना बँकेजवळ हा अपघात घडला.

नवी मुंबई :  टँकरच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तळोजा एमआयडीसीतील देना बँकेजवळील साई हॉस्पिटलसमोर सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात शिरवली-चिंध्रण येथील 55 वर्षीय मोतीराम लडकू दुर्गे यांचा मृत्यू झाला. (Tanker Two Wheeler Road Accident one Died At taloja Navi mumbai)

दुर्गे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाल्याने अपघातग्रस्त दुर्गे यांचा मृतदेह काही काळ रस्त्यावरच पडून होता.

सदर अपघाताची माहिती तळोजा वाहतूक पोलिसांना मिळताच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि तळोजा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघातानंतर टँकर चालक फरार झाल्याने त्याला पकडण्यासाठी तळोजा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहिम सुरु केली. अखेर काही वेळातच त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टँकर चालकावर तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातासंदर्भातला अधिक तपास पोलिस करत आहे.

(Tanker Two Wheeler Road Accident one Died At taloja Navi mumbai)

हे ही वाचा :

उद्यापासून तुमच्या आवडत्या गाड्या होणार महाग; मारुतीपासून हिरोपर्यंत कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय

“21 वर्षे पतीकडून काम करुन घेतलं, वेतन नाही, मृत्यूनंतरही न्याय नाही”, पीडितेचा आत्मदहनाचा इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI