AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एपीएमसीत मास्क घेण्यासाठी कोरोना नियम धाब्यावर, संचालकही फोटो काढण्यात मग्न

बाजार आवारात मास्क घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये मास्क घेताना चांगलीच झुंबड उडाली.

मुंबई एपीएमसीत मास्क घेण्यासाठी कोरोना नियम धाब्यावर, संचालकही फोटो काढण्यात मग्न
| Updated on: Mar 20, 2021 | 1:29 AM
Share

नवी मुंबई : रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई एपीएमसी बाजार आवारातील पाचही मार्केटमध्ये जवळपास पन्नास हजार मास्कचे वाटप करण्यात आले. मात्र, मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज (19 मार्च) जवळपास 700 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे बाजार आवारात हे मास्क घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये मास्क घेताना चांगलीच झुंबड उडाली. एपीएमसी मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने येथील व्यापारी आणि कर्मचारी कोरोनामुक्त राहावेत या भावनेने भाजीपाला मार्केटमध्ये देखील मास्क वाटप करण्यात आले (Violations of Corona prevention rules in Mumbai APMC by director of market remove mask for photo).

कोरोना नियंत्रणासाठी मास्क वाटप, पण संचालक मास्क काढून फोटो काढण्यात मग्न

भाजीपाला मार्केटमधील संचालकांनी गर्दी आटोक्यात आणणे अपेक्षित आहे. असं असताना संचालकच दुसऱ्याने वाटप केलेले मास्क स्वतः देतानाचा फोटो काढण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालं. तसेच जमावासमोर बोलताना स्वतः घातलेला मास्क काढून बोलले. त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये मास्क वाटप कार्यक्रमाचे तीनतेरा वाजल्याचं दिसलं.

एपीएमसी सुरक्षा रक्षक अपयशी

भाजीपाला मार्केट परिसरात मास्क वाटप करताना प्रचंड गर्दी झाल्याने सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचा पूर्ण फज्जा उडाला. नियोजन शून्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सुरक्षा रक्षकांना येथील गर्दीवर नियंत्रण आणता आलं नाही. एपीएमसी प्रशासनाने यात लक्ष न घातल्याने येथील गर्दी आवरण्यात सुरक्षा रक्षकांना अपयश आलं. परंतू मास्क घेण्यासाठी कोरोना मार्गदर्शक तत्वे गुंडाळून ठेऊन येथे प्रचंड गर्दी करण्यात आली. कोणतेही सामाजिक अंतर पाळण्यात आले नसल्याचे चित्र भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळाले.

गर्दी नियंत्रणासाठी पालिका आणि पोलीस अधिकारी

गर्दी आटोक्यात येत नसल्याने शेवटी महापालिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पालिका वाहनाने सायरन दिल्याने काही गर्दी पांगली गेली तर पोलीस आल्याने जमावाला हटवून काही वेळासाठी मास्क वाटप बंद करण्यात आले.

हेही वाचा :

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सराईत गुन्हेगारांचा अड्डा, घरफोड्यांचे 30 गुन्हे दाखल असणाऱ्यांना बेड्या

TV9 Impact : एपीएमसी मार्केटमधील गर्दीची दखल, APMC मार्केटमध्ये अचानक आयुक्तांची एन्ट्री

मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण, बटाटा आणि लसूणही गडगडला, वाचा आजचे दर

व्हिडीओ पाहा :

Violations of Corona prevention rules in Mumbai APMC by director of market remove mask for photo

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.