AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिकांची याचिका फेटाळली, मलिक यांना मोठा धक्का

ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती.

ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिकांची याचिका फेटाळली, मलिक यांना मोठा धक्का
नवाब मलिक यांची ईडीच्या कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धावImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2022 | 12:19 PM
Share

मुंबई: ईडीच्या (ED) कारवाईला विरोध करणारी नवाब मलिक (nawab malik) यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) फेटाळली आहे. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका केली होती. ईडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी या याचिकेतून केला होता. त्यावर कोर्टाने मलिक यांना फटकारले आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाने नवाब मलिक यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मलिक आता कोणत्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मलिक यांना रितसर जामीन अर्ज करण्याचा पर्याय खुला असल्याचंही कोर्टाने म्हटलं असून त्यामुळे मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मलिक यांना आता जामीन मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांची कोर्टाने याचिका फेटळाल्याच्या निर्णयाचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. मलिक यांची याचिका फेटाळली त्याचं स्वागत आहे. मलिक यांनी केलेल्या व्यवहारात टेरर फंडिंग झाल्याचं कोर्टानेही मान्य केलं आहे. त्यामुळेच कोर्टाने याचिका फेटाळली असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांना अटक का?

3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊत विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसंच अन्य गुन्ह्यात दाऊदचा सहभाग आहे, असं ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

दाऊदची 200 कोटी रुपयांची संपत्ती कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काही काळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केलाय. इतकंच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असंही सिंग यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध, सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Breaking : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, तर मलिकांचा भाजपला सूचक इशारा!

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना अटक, आघाडीचे नेते काय करणार? पवारांच्या भेटीनंतर भुजबळांनी कार्यक्रम सांगितला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.