कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध, सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार

गोव्याची सत्ता राखण्यात भाजप यशस्वी ठरली असली तरी आता गोवा भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भाजपने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली.

कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध, सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार
कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध
Image Credit source: tv9 marathi
दिनेश दुखंडे

| Edited By: भीमराव गवळी

Mar 15, 2022 | 11:57 AM

पणजी: गोव्याची सत्ता राखण्यात भाजप (bjp) यशस्वी ठरली असली तरी आता गोवा भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) यांच्या नेतृत्वात भाजपने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे सावंत हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच विश्वजीत राणे (vishwajit rane) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी केल्याने गोवा भाजपमध्ये पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपला निकाल लागून पाच दिवस उलटले तरी गोव्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही. राणे यांच्या या दाव्यामुळे आता हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार आहेत. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून गोव्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत सावंत यांच्याकडेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद जाते की विश्वजीत राणे यांना संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज गोव्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर प्रमोद सावंत संध्याकाळी दिल्लीला जातील. निवडणूक निकालानंतर सावंत हे पहिल्यांदाच दिल्लीला जात आहे. या भेटीत ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह आणखी काही नेत्यांची भेट घेणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घएमरा आहेत. यावेळी गोव्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मगोपला विरोध

सध्या गोव्यात भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठीचं बहुमत आहे. भाजपचे 20, अपक्ष 3 आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 असे एकूण 25 आमदारांचे संख्याबळ गोव्यात सत्तास्थापनेसाठी पक्षाकडे आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचे गूढ अजुन कायम आहे. नवनिर्वाचित आमदार आणि माजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा घेण्याच्या मुद्द्यावर गोवा भाजपाअंर्तगत प्रचंड विरोध आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावंत यांची दिल्लीवरी महत्वाची मानली जातेय.

संबंधित बातम्या:

Hijab Ban : कर्नाटकमधल्या हिजाब बंदीवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब, हिजाब धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं, आता इतरांना संधी द्या; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबाला मोठा झटका

Maharashtra News Live Update : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच आंदोलन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें