AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण, गडचिरोलीत 61 नक्षलवाद्यांचे सरेंडर, मास्टरमाईंड भुपती कोण?

गडचिरोलीत ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यात नक्षलवादी चळवळीतील महत्त्वाचे सदस्य सोनू उर्फ भुपती यांचा समावेश आहे. हे गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे आत्मसमर्पण मानले जात आहे. या घटनेमुळे नक्षलवादी चळवळ कमालीची खिळखिळी झाली असून, त्यांच्या मनुष्यबळाला मोठा धक्का बसला आहे

नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण, गडचिरोलीत 61 नक्षलवाद्यांचे सरेंडर, मास्टरमाईंड भुपती कोण?
फोटो- प्रातनिधिक
| Edited By: | Updated on: Oct 14, 2025 | 12:12 PM
Share

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला दिली आहे. विशेष म्हणजे, या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षलवादी चळवळीतील एक महत्त्वाचे आणि केंद्रीय समितीचे मोठे सदस्य सोनू ऊर्फ भुपती यांचा समावेश आहे. यामुळे नक्षलवादी चळवळ कमालीची खिळखिळी झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे हे सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण आत्मसमर्पण ठरले आहे. या आत्मसमर्पण केलेल्या ६१ नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वच मोठ्या नक्षलवादी कॅडरचा समावेश आहे. यामुळे या भागातील नक्षलवादी कारवायांना आणि त्यांच्या मनुष्यबळाला मोठा धक्का बसला आहे.

सोनू ऊर्फ भुपती कोण?

  • सोनू ऊर्फ भुपती याचे मूळ नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव असे आहे. हा नक्षलवादी (माओवादी) पक्षाच्या पोलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य आहे. तो ६९ वर्षांचा असून, बीकॉम पदवीधर आहे.
  • नक्षलवादी चळवळीतील अत्यंत वरिष्ठ आणि महत्त्वाचा सदस्य म्हणून त्याची ओळख आहे.
  • तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील माड डिव्हिजन मध्ये सक्रिय होता.
  • तो गेल्या ४० वर्षांपासून संघटनेत सक्रिय होता
  • त्याच्यावर गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांची जबाबदारी होती. त्याच्यावर जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

पत्नीचे गेल्यावर्षी आत्मसमर्पण 

भूपती हा माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा बंधू किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) २०११ मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता. भुपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहेत.  काही दिवसांपूर्वीच भुपतीने केंद्र सरकारला शांतता वार्ताच्या चर्चेसाठी तसेच तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते.

किती गुन्हे दाखल? याची माहिती घेतली जाणार 

दरम्यान सध्या आत्मसमर्पण केलेल्या या सर्व माओवाद्यांवर कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे दाखल आहेत आणि प्रत्येकावर किती बक्षीस आहे, याची सखोल माहिती गडचिरोली पोलीस विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे घेत आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.